Ajit pawar On Vijay Wadettiwar : अर्थमंत्री म्हणून मी बैठक घेतली, ओरड कशाला करतात? अजितदादांनी वडेट्टीवारांना फटकारले..

Maharashtra Politics : . "आमच्यामध्ये कुठलेही कोल्ड वॉर नाही, आमच्याच कुठलाही वाद नाही,"
Ajit Pawar, Vijay Wadettiwar
Ajit Pawar, Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Pune : "अर्थमंत्री म्हणून मी आढावा बैठक घेतली म्हणून ओरड कशाला करतात," असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना फटकारले. "क्षुल्लक गोष्टींवरुन बाऊ कशाला करतात. विरोधी पक्षनेतेपद हे जबाबदारीचे पद आहे," असा टोला अजितदादांनी वडेट्टीवारांना लगावला.

अजित पवार आज (शनिवारी) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचा बातम्या चुकीच्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. "आमच्यामध्ये कुठलेही कोल्ड वॉर नाही, आमच्याच कुठलाही वाद नाही," असे अजितदादांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar, Vijay Wadettiwar
Eknath Khadse on Nawab Malik : एकनाथ खडसेंचे मलिकांबाबत मोठे विधान ; "मलिकांना भाजपची ऑफर.."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वॉर रुमवरुन कोल्ड वॉर सुरु झाला असल्याचा दावा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. अजित पवार यांनी वॉररुममध्ये बैठक घेतली. अधिकार नसतानाही अजित पवार यांनी वॉररुममध्ये ही बैठक घेतली आहे. यावरुन वडेट्टीवार यांनी टीका केली होती.

Ajit Pawar, Vijay Wadettiwar
NCP Split : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार अन् वळसे पाटील पहिल्यांदाच एकत्र येणार..

"महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकारमध्ये एकत्र आले आहोत. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. मागील अडीच वर्षे मी सरकारमध्ये असताना अनेकदा राज्यातील महत्वाकांशी प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी दर 15 दिवसांनी आढावा बैठका घेत होतो. या बैठकीमधून त्या प्रकल्पांना गती देण्याचे काम करत होतो. सध्यस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांच्या आढावा घेण्यासाठी एका कमिटीची नेमणूक केली आहे. कोल्ड वॉर वैगरे असे काही नाही.मोपलवार यांना या कमिटीची जबाबदारी देण्यात आली असून ही कमिटी सध्या राज्यातील महत्वाकांशी प्रकल्पांचा आढावा घेते," असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, "“महाराष्ट्राच्या विकासासाठी, लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झाले. हे सगळं असताना मी अर्थमंत्री म्हणून राज्यातील महत्वाकांशी प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो, पण अंतिम निर्णय हे मुख्यमंत्रीच घेऊ शकतात.”,

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com