Eknath Khadse on Nawab Malik : एकनाथ खडसेंचे मलिकांबाबत मोठे विधान ; "मलिकांना भाजपची ऑफर.."

Maharashtra Politics : मलिक यांच्यावर शरद पवारांचे खूप उपकार आहेत.
Eknath Khadse ,  Nawab Malik
Eknath Khadse , Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon : दीड वर्षांपासून तुरुंगात खितपत पडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते, माजी मंत्री नवाब मलिकांना शुक्रवारी जामीन मिळाल्यानंतर ते कोणत्या गटात जाणार या बाबत जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. मलिक हे आपल्याच गटात येतील, असे ठामपण दोन्ही गटातील काही नेते सांगत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसेंनी मात्र मलिकांबाबत मोठे विधान केले आहे.

"नवाब मलिक यांना भारतीय जनता पक्ष आपल्याकडे येण्याची ऑफर देऊ शकते,' असे खडसेंनी माध्यमांना सांगितले. खडसे म्हणाले, "नवाब मलिक यांच्यावर शरद पवारांचे खूप उपकार आहेत, त्यांना अनेक ठिकाणी संधी दिली, मंत्री केले आहे, त्यांनीही प्रचंड मेहनत पक्षासाठी केली आहे. त्यामुळे मला असे वाटते ते शरद पवार यांच्या सोबत राहतील,"

Eknath Khadse ,  Nawab Malik
NCP Split : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार अन् वळसे पाटील पहिल्यांदाच एकत्र येणार..

नवाब मलिकांनी भाजपमध्ये यावे, यासाठी त्यांना जामीन मंजूर करण्यात आल्या असल्याच्या चर्चेबाबत खडसे म्हणाले, "याबाबत मला माहीत नाही, परंतु त्यांना भाजप ऑफर देवू शकते, भाजपमध्ये एक मशीन आहे. त्यामध्ये कुठलाही व्यक्ती टाकली की ती स्वच्छ होऊन बाहेर येते, नंतर मंत्री होते,"

Eknath Khadse ,  Nawab Malik
Rahul Gandhi On Manipur: मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना मोदी-शाहांनी पाठीशी घातले ; राहुल गांधी संतापले..

मलिकांना जामीन मंजूर होताच आमदार रोहित पवार यांनी समाधान व्यक्त करत मलिक यांच्या आरोग्याची काळजी करत एकाधिकारशाहीच्या विरोधात लढू या, असे ट्विट करत निर्धार व्यक्त केला. रोहित पवार यांनी ट्विट करत "उशिरा का होईना साहेब आपल्याला न्याय मिळाला, तब्येतीची काळजी घ्या, आणि एकाधिकारशाहीच्या विरोधात एकत्र लढूया!", असे म्हटले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com