Jitendra Awhad and Ajit Pawar: Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad Vs Ajit Pawar : जितेंद्र आव्हाडांना घेरण्यासाठी अजित पवार गटाची मोठी खेळी

Mumbra-kalwa Election Assembly : आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असतं.

राहुल क्षीरसागर

Thane News : राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यापासून अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट हा वाद चांगलाच पेटलेला आहे. यातच आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार हे ऐकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीका करताना अनेकदा दिसले. आता आगामी निवडणुकीत आव्हाडांना घेरण्यासाठी अजित पवार गटाने मोठा डाव टाकला आहे.

आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात मकरसंक्रांतीच्यानिमित्ताने 13 जानेवारीला होम मिनिस्टर सन्मान महिलांचा, खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून यानिमित्ताने आव्हाडांना घेरण्याचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला, आनंद परांजपे यांच्यात अनेकदा आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. यातच आता त्यांनी मुंब्रा-कळवा या विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करीत आव्हाडांना धक्का देण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. येणाऱ्या निवडणुकीत आपण केलेल्या कामांवरच मते मागणार असल्याचे आव्हाडांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे अजित पवार गट आव्हाडांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

नव्या वर्षाच्यानिमित्ताने तब्बल 50 हजार घरात अजित पवार गटाने कॅलेन्डर पोहोचवत आपले ब्रँडिंग केले आहे. त्यानंतर आता येथील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवी शक्कल लढविण्यात आली आहे. मकरसंक्रांतीच्यानिमित्ताने कळवा-मुंब्रा मतदारसंघात महिलांसाठी होम मिनिस्टर सन्मान महिलांचा, खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमाला मंत्री अदिती तटकरेदेखील उपस्थित राहणार आहेत. ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे राष्ट्रवादी महिला अध्यक्षा वनिताताई गोतपागर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम 13 जानेवारीला पार पडणार आहे. या कार्यक्रमात महिलांना पैठणीबरोबर नथ आणि इतर आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT