Nashik News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन नाशिकमध्ये शुक्रवारी पार पडलं. या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी संपूर्ण नाशिक शहर सजलं होतं. या महोत्सवासाठी पंतप्रधान मोदी येणार असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती.
देशभरातील कलाकारांनी शहरातील विविध ठिकाणी कलाकृती रेखाटल्या होत्या. एवढंच काय तर पंतप्रधान मोदींच्या स्वागताच्या वेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री दादा भुसे यांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला. दादा भुसे यांनी सगळ्यांसोबत पारंपारिक तीन पावली नृत्य केलं. त्यांचा ढोल-ताशांच्या तालावर नृत्य केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या राष्ट्रीय युवा महोत्सवात देशभरातील तब्बल 8 हजारापेंक्षा जास्त युवक सहभागी झाले होते. या महोत्सवात अनेक युवक आकर्षक कलाकृती रेखाटताना दिसून आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळाराम मंदिरात जाणून दर्शन घेतलं. तसेच पंतप्रधान मोदींचा नाशिकमध्ये 'रोड शो'ही झाला. या 'रोड शो'ला लोकांची मोठी गर्दी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.
या 'रोड शो' वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाहनावर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री पवार होते. सर्वांनी रोड-शोदरम्यान उपस्थितांना हात उंचावून प्रतिसाद दिला.
"आजचा दिवस फक्त नाशिक शहर नव्हे, तर महाराष्ट्रासाठी अतिशय वेगळा आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी नाशिकला आले आहेत. त्यामुळे प्रत्येक नाशिककर त्यांचे स्वागत करण्यात उत्सुक आहे. त्यात मी देखील सहभागी झालो मला आज खूप आनंद वाटतो आहे," अशी प्रतिक्रिया पालकमंत्री भुसे यांनी यावेळी दिली.
(Edited By- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.