Jitendra Awhad News Sarkarnama
मुंबई

Thane politics : शरद पवारांचे शिलेदार आव्हाडांची होमपिचवर कोंडी; मुंब्रा विकास आघाडी पुन्हा सक्रीय

NCP News : ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात मोठी आघाडी

राहुल क्षीरसागर

Jitendra Awhad News : गेल्या वर्ष दीड वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात कमालीचे खटके उडाले आहेत. त्यात शिंदे आव्हाड यांच्यात आरोपप्रत्यारोपांच्या फैरी देखील झाडल्या जात आहेत. त्यातच आता, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडाचा झेंडा फडकावीला आहे.

त्यामुळे ठाण्यातील किती नगरसेवक अजित पवार यांच्या गोटात सहभागी होणार किती आव्हाड यांच्या बाजूने उभे राहतील याची चर्चा जोर धरू लागली आहेत. असे असताना, दुसरीकडे मुंब्रा विकास आघाडीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह ८ माजी नगरसेवक सहभागी असून पुन्हा एकदा हि आघाडी सक्रीय होतांना दिसून येत आहे.

त्यात येत्या आठवड्याभरात आघाडीचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मुंब्य्रात त्याच माध्यमातून महापालिका निवडणुका लढविल्या जातील असा दावाही करण्यात येत आहे. त्यामुळे आव्हाडांची त्यांच्या होमपिचवर कोंडी करण्याची रणनीती तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

गेल्या वर्षभरापासून आव्हाड यांना मुंब्य्रात शह देण्यासाठी मुंब्रा विकास आघाडीची स्थापना करीत रणनीती आखली जात आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेकडून मिशन कळवा मुंब्रा हाती घेण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मुंब्य्रात शिंदेचे फलक लावीत एकप्रकारे आव्हान देखील दिले होते. मुंब्रा कळवा हा आव्हाडांचा बालेकिल्ला मानला जात आहे. मात्र, याच बालेकिल्याला सुरुंग लावण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरु झाले आहे.

ठाण्यातील मध्यवर्ती भागात राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक असून त्यातील चार माजी नगरसेवकांनी शिवसेनेत (Shivsena) यापूर्वीच प्रवेश केला आहे. त्यात आता अजित पवार वेगळे झाल्याने नजीब मुल्ला हे देखील त्यांच्या सोबत गेले होते. तसेच आणखी १५ नगरसेवक सोबत येतील असा दावा देखील केला जात आहे.

त्यामुळे सध्याच्या घडीला ठाण्यात राष्ट्रवादीमध्ये तणावाचे वातावरण आहे. मुंब्य्रात मुंब्रा विकास आघाडी पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. त्यांनी या आघाडीचे रजिस्ट्रेशनसाठी फाईल टाकली आहे. त्याची स्फुटणी देखील झाली असल्याची माहिती आघाडीचे प्रणेते राजण किणे यांनी दिली. तर पुढील आठ दिवसात या आघाडीला ग्रीन सिग्नल मिळेल असा दावा देखील त्यांनी केला आहे.

तसे झाल्यास मुंब्य्रात आव्हाडांना हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच या आघाडीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांसह ८ माजी नगरसेवक, एमआयएम आणि समाजवादीचे काही माजी नगरसेवक येण्याची शक्यता नाकर्ता येत नाही. त्यामुळे भविष्यात मुंब्य्रातील आव्हाड यांचे गणित चुकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT