Delhi News : ऐन दिवाळीत राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे, मात्र,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या निवडणुका संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरची सुनावणी सुप्रीम कोर्टात आज (बुधवारी) होणार होती. मात्र, ही सुनावणी झाली नाही.
पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे जवळपास दोन महिने सुनावणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे या वर्षा अखेरपर्यंत राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुका आता लोकसभा निवडणुकांनंतरच होतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील महापालिकेचा कार्यकाळ हा मार्च २०२२ मध्ये संपला आहे, तर जिल्हा परिषद व पंचायत समितीची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली आहे. तर राज्यातील १९२ नगरपालिका व जिल्हा परिषदेचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाला आहे. त्यामुळे मुदत संपून जवळपास दीड ते दोन वर्षाचा कालावधी लोटला तरीही या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार असल्याने या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते, मात्र हे यावरील या प्रकरणावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने २८ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलल्याने आता परत एकदा वाट पाहावी लागणार आहे. या निवडणुका लांबणीवर गेल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. यापूर्वी ओबीसी आरक्षणाचा तिढा असल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.