Buldhana : गरजू लोकांना स्वस्तात घरं मिळण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पण अनेक ठिकाणी लाभार्थी घरकुल योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित आहेत. असाच प्रकार बुलढाण्याच्या संग्रामपुर तालुक्यातील कोद्री गावात नुकताच घडला.
घरकुल योजेनेचा लाभ मिळण्यास विलंब लागत असल्याने एका युवकाला घर मिळालेले नाही, त्यामुळे त्याचे लग्न होत नसल्याची खंत त्याने गटविकास अधिकाऱ्याकडे मांडली आहे. याबाबतचे निवदेन त्याने अधिकाऱ्याला दिले आहे.
कोद्री या गावांमध्ये घरकुल योजनेची अंमलबजावणी अतिशय संथ गतीने होत आहे. येथील अंकुश कड याला घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी विलंब होत आहे. पर्यायाने पक्क्या घराअभावी त्याचं लग्न होत नाही. त्यामुळे "घरकुल द्या किंवा बायको द्या," अशी अजब मागणी अंकुश कड याने संग्रामपूर गटविकास अधिकाऱ्याकडे केली आहे.
मग घरकुल मिळून काय फायदा?
"पाच वर्षात केवळ पाच लाभार्थ्यांना घरकुल मिळाले, माझा घरकुल यादीत 35 वा क्रमांक आहे. माझे वय 30 आहे. दरवर्षी एकच घरकुल मिळणार असेल तर 35 वा नंबर येईल तेव्हा मी म्हातारा होईल, मग घरकुल मिळून काय फायदा? असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे. "घर नसल्याने कोणी मुलगी देत नाही," या आशयाचे निवेदन अंकुश कड याने संग्रामपूर गट विकास अधिकाऱ्यांकडे दिले आहे.
गटविकास अधिकाऱ्याला झापले...
दरम्यान, संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा येथील सरपंचाविरुद्ध ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती समोर उपोषणाला बसले आहेत. गेल्या चार दिवसापासून हे उपोषण सुरू आहे. मात्र या उपोषणाला प्रतिसाद न देता मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या 'स्वाभिमानी'च्या व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना संग्रामपूर पंचायत समितीतील गट विकास अधिकाऱ्यांनी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. यावरून वाद निर्माण झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते,ठाकरे गटाचे कार्यकर्ते गटविकास अधिकाऱ्यावर धावून गेले, त्यांनी अधिकाऱ्याला झापले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.