Murder Case  sarkarnama
मुंबई

Murder Case : धक्कादायक! राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाची मध्यरात्री हत्या

Roshan More

Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) भायखळा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांच्या शुक्रवारी (ता.4) धारधार हत्याराने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाला आहे. सचिन यांच्या घराजवळ भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे ही घटना घडल्याची माहिती आहे.

सचिन कुर्मी हे समीर भुजबळ यांच्या जवळील कार्यकर्ते म्हणून परिचित होते. समीर भुजबळ हे कुर्मी परिवाराची भेट घेणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन यांच्यावर अज्ञान हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये सचिन गंभीर जखमी होऊन पडले होते.पोलिसांच्या गाड्यातून त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात डाॅक्टरांनी सचिन यांना मृत घोषित केले.

सचिन कुर्मी यांच्यावर करण्यात हल्ला राजकीय की वैयक्तिक कारणातून केला गेला हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, आपापसातील वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सचिन कुर्मी यांचे समर्थक आक्रमक झाले असून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT