Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

MVA News : जागावाटपावरून 'मविआ'च्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, 'काही गोष्टी...'

Political News : आघाडीच्या जागा वाटपात कुठलाही विषय अडकलेला नाही. त्यामुळे जागावाटप कधी पूर्ण करायचे हा रणनीतीचा भाग असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी सांगितले.

Sachin Waghmare

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने जोरात सुरु केली आहे. महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या जागावाटपाकडे लागले असतानाच महाविकास आघाडीच्या नेत्याने मोठं विधानं केलं आहे.

आघाडीच्या जागा वाटपात कुठलाही विषय अडकलेला नाही. त्यामुळे जागावाटप कधी पूर्ण करायचे हा रणनीतीचा भाग असल्याचे शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी सांगितले. (MVA News)

विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीचे विभागनिहाय जागावाटप सुरु आहे. संपूर्ण विभागांच्या चर्चा फेऱ्यांमध्ये होत आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. मुंबईची चर्चा सुरू असताना काही गोष्टी इतर पक्षांना सुद्धा सांगायच्या आहेत. त्यामुळे जागा वाटपात कुठलाही विषय अडकलेला नाही. माविआच जागावाटप कधी पूर्ण करायचा हा रणनीतीचा भाग असल्याचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी स्पष्ट केले.

मी पुणे शहराचा पालकमंत्री राहिलेलो आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची हत्या होते आणि पोलीस म्हणतात अंतर्गत वाद आहे. अंतर्गत वादात पिस्तूल हत्यार आली कुठून? कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यामध्ये राहिलाच नाहीये का? मी पुणे शहराचा पालकमंत्री राहिलेलो आहे. तेव्हा असे प्रकार होतं असताना याला जबाबदार कोण असा सवाल सचिन अहिर यांनी केला आहे.

राज्यातील महायुतीच्या सरकारने दोन वर्षात फक्त आश्वासन दिली आहेत, पण आश्वासनाची पूर्तता अद्याप केलेली नाही. राज्यात घडत असलेल्या घटनांना सरकार जबाबदार असून यामध्ये सगळी जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्यात आंदोलन होऊ नये, यासाठी सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण केली पाहिजेत, असेही अहिर म्हणाले.

लालबागची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या सगळ्या घटनेची चौकशी व्हायला हवी. अरविंद सावंत, अजय चौधरी घटनास्थळी गेले होते. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अजूनही एक व्यक्ती सिरीयस आहे. एका मुलीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. बेस्टने आणि शासनाने मुलीच्या कुटुंबीयांना मदत केली पाहिजे, अशी मागणी अहिर यांनी केली आहे.

पुतळा कोसळल्यानंतर त्यासाठी गठित केलेली समिती अजूनही त्या ठिकाणी न पोहोचणे, हे अवघड आहे. सरकारची मानसिकता देखभाल करण्याची नाहीये. या सगळ्या विरोधात प्रचंड संख्येने जर लोक पुन्हा उतरले तर याची जबाबदारी कोणाची? असा सवालही अहिर यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT