Bjp News : जरांगेंचे आंदोलन भरकटले, भाजप नेत्याचं मोठं विधान

Political News : गेल्या काही दिवसांपासून जरांगेंचे आंदोलन भरकटलेले दिसत आहे. लोक त्यांच्या मागे नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस द्वेषची कावीळ त्यांना झाली आहे, अशी टीका भाजपच्या नेत्यानी केली.
Pravin Darekar, Manoj Jarange
Pravin Darekar, Manoj Jarange Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांचे मत बदलताना दिसत आहे. पहिले नोंदी, मग सगेसोयरे त्यानंतर मराठवाडा प्रश्न, मग राज्यव्यापी भूमिका मग आता फक्त पाडापाडीची भूमिका त्यांनी घेतली आहे. मनोज जरांगेंचे आंदोलन भरकटलेले दिसत आहे. लोक त्यांच्या मागे नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस द्वेषची कावीळ त्यांना झाली आहे, अशी टीका भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.

प्रसार माध्यमांशी बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यातील विविध घटनाक्रमावर मत व्यक्त केले आहे. पुण्यातील खुनाची घटना ही प्रॉपर्टीच्या वादातून झालेली आहे. त्या ठिकाणी असा काही झाले तर ते सत्ताधारी यांच्यावर खापर फोडायला हवे. केवळ 24 तास डोक्यामध्ये राजकारण आहे. त्यामुळे काही झाले तरी फडणवीस यांच्यावर आरोप केले जात आहेत. आरोप करणाऱ्यांचे डोकं फिरले आहे, अशी टीका भाजपचे (Bjp) आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. (Bjp News)

औरंगाजेब फॅन क्लबबद्दल अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ह्यांची कृती आणि वृत्ती वेगळी आहे. ह्यांचे विचार महाराष्ट्राने पहिले आहेत. संजय राऊत यांनी काहीही बोलण्यापूर्वी इतिहास पहिले समजून घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मला वाटतं महायुतीतीमधील प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावे असा वाटते. पण महायुतीची भूमिका आहे की या ठिकाणी मुख्यमंत्री महायुतीचा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. रामराजे निंबाळकर यांच्या मनात काय आहे ते बाहेर यायला लागले आहे. त्यांच्या मनात काही असेल तर महायुती समजून घेईल. पण त्यांनी ठरवले आहे ते पुढे येईल, असेही ते म्हणाले.

Pravin Darekar, Manoj Jarange
Nitin Gadkari News : तुमच्या रस्त्याचे काम झाले म्हणून समजा; गडकरींनी दिला आमदार शेळकेंना शब्द

महाविकास आघाडीचा सर्व्हे आला आहे. त्यामुळे त्यावर किती विश्वास ठेवायचं हे पाहावे लागेल, जनाधार ज्यांच्या बाजूने आहे आणि अजून 3-4 निकषावर या ठिकाणी निर्णय होईल, असेही दरेकर म्हणाले. खडसे यांनी भाजपला गृहीत धरले होते पण भाजप सर्वार्थाने विचार करते. ते नसताना देखील जागा निवडून आणल्या आहेत. पक्षांचे संघटन एकत्र असून चांगले आहे. महायुतीच्या जागावाटपात भाजप हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे तो मोठा भाऊ असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिखर बँक प्रकरणात न्यायालयीन गोष्टी असतील तरी त्यांना क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे ती गोष्ट क्लिअर आहे. त्या ठिकाणी फक्त कोणाला बदलता येणार नाही,असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

Pravin Darekar, Manoj Jarange
Mahayuti Seat Allotment : महायुतीच्या जागावाटपाबाबत बावनकुळेंचे मोठे विधान; 176 जागांवर एकमत, मतभेद असणाऱ्या 112 जागा कोणत्या?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com