Ravindra Chavan On Satyacha Morcha .jpg Sarkarnama
मुंबई

BJP On Satyacha Morcha: ठाकरे बंधूंचा मविआसह धडकी भरवणारा 'सत्याचा मोर्चा',भाजपची पहिली झणझणीत रिअ‍ॅक्शन आली; रवींद्र चव्हाण म्हणाले...

Satyacha Morcha News: भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी यावेळी अनेक एनजीओ या विरोधकांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी विरोधकांचा हा कट हाणून पाडला पाहिजे असंही सांगितलं.

Deepak Kulkarni

Mumbai News : देशात बिहार विधानसभेच्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर मतचोरीचा मुद्दा पेटला आहे. थेट निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांनी त्यातही उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी आता रान पेटवलं आहे.

याच पार्श्वभूमीवर आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसलेल्या महाविकास आघाडीनं ‘सत्याचा मोर्चा’ काढत निवडणूक आयोगावर निशाणा साधतानाच मुंबई महापालिका आणि इतर स्थानिकच्या निवडणुका भाजपसह महायुतीला सोप्या नसणार हेच दाखवून दिलं. आता सत्याचा मोर्चावर भाजपकडून आणि तीही थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीच प्रतिक्रिया समोर आली आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेस,उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांसह मनसेनं मुंबईत शनिवारी (ता.1 नोव्हेंबर) सत्याचा मोर्चा काढण्यात आला. विरोधकांच्या या मोर्चावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी जोरदार हल्ला चढवला. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांना हा विरोधकांचा हा कट उधळून लावा अशा सूचनाही केल्या.

रवींद्र चव्हाण म्हणाले,विरोधकांकडून विकासाची चर्चा बंद आहे. योजनांची चर्चा बंद आहे, पुढे राज्य कसं जातंय याची चर्चा बंद आहे. गतिमान करण्याचे काम आपण करतोय तेव्हा काही एनजीओ, महाराष्ट्र आणि देशात मोठ्या प्रमाणात फंडिंग करत एनजीओच्या माध्यमातून अशा काही मंडळींना खतपाणी घालत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न काय होतं? प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. पण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच बीडीडी चाळीतील प्रकल्प आणि घर देण्याचे काम करण्यात आलं.मात्र, तुमच्या सोबतच्या लोकांनी पत्राचाळ किंवा इतर प्रकल्प लालफितीत अडकवून ठेवल्याची टीकाही रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केली.

मविआच्या काही घटक पक्षांनी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्धार एक महिन्यापूर्वीच केला होता. यावेळी कोणी काय करावं? कोणत्या नेत्यानं कशापद्धतीचा विषय मांडावा. यानंतर अनेक विषय वेगवेगळ्या पद्धतीनं मांडायला सुरुवात झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केले.हा मोर्चा जनतेची दिशाभूल करणारा असून तो विरोधकांचा मोर्चा असल्याचं समजू नका, असंही त्यांनी म्हटलं.

भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी यावेळी अनेक एनजीओ या विरोधकांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी विरोधकांचा हा कट हाणून पाडला पाहिजे असंही सांगितलं. तसेच जनतेला विनंती आहे की एका चांगल्या दिशेनं महाराष्ट्राला न्यायचं आहे. बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांनी हा डाव उधळून लावावा, घरोघरी जात नागरिकांना स्पष्ट केलं पाहिजे असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या सत्याचा मोर्चात दुबार मतदारांना रोखण्यासाठी थेट फटकावण्याची भाषा केली. राज यांनी दुबार मतदार आढळल्यास त्यांना फोडून काढा आणि पोलिसांत द्या असं म्हटल याचवेळी उद्धव ठाकरेंनीही मतचोरी दिसली की, तिथेच फटकावा” अशा सूचना कार्यकर्त्यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT