Pune Graduate Constituency : भाजपकडून पुणे पदवीधरचा उमेदवार जाहीर; 24 तासांतच हसन मुश्रीफांनी मांडलं पराभवाचं गणित

Pune Graduate Constituency : भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांची उमेदवारी जाहीर केली. चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली.
Minister Chandrakant Patil announces Sharad Lad as BJP candidate for the Pune Graduate Constituency, sparking discontent among ally NCP leaders.
Minister Chandrakant Patil announces Sharad Lad as BJP candidate for the Pune Graduate Constituency, sparking discontent among ally NCP leaders.Sarkarnama
Published on
Updated on

Pune Graduate Constituency : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने विद्यमान आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे.सांगली जिल्ह्यातील पलूस येथील एका कार्यक्रमात "ताकाला जाऊन भांड लपवण्यात अर्थ नाही" असे म्हणत भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लाड यांच्या नावाची घोषणा केली. या घोषणेनंतर आता मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असतानाही शरद लाड यांना भाजपमध्ये घेऊन परस्पर ही उमेदवारी जाहीर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भैय्या माने यांचे नाव पुढे केले होते. मात्र मंत्री पाटील यांनी थेट उमेदवारीची घोषणा केल्यानंतर आता मुश्रीफ यांनी देखील शरद लाड यांचा पराभव कसा होणार याचं गणित मांडलं आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटील आणि आमच्या सर्वांची मुंबईत तीन दिवसांपूर्वी त्यांच्याच बंगल्यावर बैठक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशासंदर्भात लढवायच्या याबाबत चर्चा झाली. मात्र, त्यांनी हे विधान केलं हे दुर्दैवी आहे. आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा एकदा बसण्याचे ठरले होते. ज्या जागा आहेत त्या तिन्ही पक्षातील वरिष्ठांनी ठरवायचे आहेत आणि त्या ठरलेल्या आहेत. एकत्र निवडणूक लढवता नाही आली तर स्वतंत्र लढवायची पण महायुतीची सत्ता आणायची हे ठरलेलं आहे.

Minister Chandrakant Patil announces Sharad Lad as BJP candidate for the Pune Graduate Constituency, sparking discontent among ally NCP leaders.
Pune Graduates Constituency: पुणे पदवीधरचा उमेदवार जाहीर! भाजपनं अजित पवार, मुश्रीफांसह, भैय्या मानेंचे मनसुबे उधळले

पदवीधरची निवडणूक अजून एक वर्ष आहे वर्षभरापूर्वीच एवढी चर्चा का करत आहेत. मागच्या निवडणुकीत अरुण लाड हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते. त्या अरुण लाड यांनी पक्ष बदललेला नाही, त्यांच्या चिरंजीवांनी बदललेला आहे. मागील वेळी अरुण लाड यांनी मला स्पष्ट सांगितले होते मी किंवा आमच्या घरातील कोणीही व्यक्ती पुढच्या निवडणुकीला उभा राहणार नाही. भैय्या माने यांना उमेदवारी द्या त्यांनी माझ्यावेळी खूप कष्ट घेतलेत, असे असताना देखील त्यांनी पक्ष बदललेला आहे. असा दावा मंत्री मुश्रीफ यांनी केला.

Minister Chandrakant Patil announces Sharad Lad as BJP candidate for the Pune Graduate Constituency, sparking discontent among ally NCP leaders.
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाने महिला पदाधिकार्‍याला मारहाण, जीवे मारण्याचीही धमकी!

आता ज्यावेळी आम्ही तिन्ही पक्ष बसू त्यावेळी आम्ही त्यांना पुन्हा समजावून सांगू. नाहीतर शेवटी मैत्रीपूर्ण लढत करण्याशिवाय पर्याय नाही. गतवेळी कोल्हापूर जिल्ह्याने 68 टक्के मतदान अरुण लाड यांना केले आहे. आमचा या उमेदवारीवर हक्क आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजावून सांगू. आम्ही कसे निवडून येऊ आणि शरद लाड कसे पराभव येणार याची गणित मुख्यमंत्र्यांसमोर मांडू, असेही मुश्रीफ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com