Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Explanation: माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला; शरद पवारांचे 'त्या' विधानावर स्पष्टीकरण

Sharad Pawar Explanation on Statement : महाविकास आघाडीत ऐक्य राहावं हाच माझा प्रयत्न, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं.

सरकारनामा ब्यूरो

NCP Political News : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणीला लागले असतानाच रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं होतं.

''आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसोबत राहणार की नाही हे आताच सांगता येणार नाही'', असं शरद पवार म्हणाले होते. त्यामुळे महाविकास आघाडी संदर्भात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, आता शरद पवार यांनीच आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.

शरद पवार म्हणाले, ''माझ्या कालच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. महाविकास आघाडीचं ऐक्य राहावं असाच माझा हेतू आहे. महाविकास आघाडीत अजून जागावाटपासंदर्भात ठरलं नाही. जागा वाटपाबाबत संर्दभ देत माझं कालचं वक्तव्य होतं. पण माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. महाविकास आघाडीत ऐक्य राहावं हाच माझा प्रयत्न आहे'', असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

2024 च्या निवडणुका वंचित बहुजन आघाडीसोबत मविआ एकत्र लढेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना पवार म्हणाले होते की, "वंचितची आघाडीसोबत चर्चा झालेली नाही. जी चर्चा झाली ती कर्नाटकातील मर्यादीत जागांविषयी होती. दुसरी कसलीही नव्हाती'', असं पवार म्हणाले होते.

तसेच महाविकास आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले होते की, ''आम्ही एकत्र लढणार वगैरे आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण इच्छा पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यामध्ये काही इश्यू असतात. त्यामुळे हे अजून ठरलेलं नाही तर पुढचं कसं सांगता येईल. मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच कसं सांगू?'', असं विधान शरद पवार यांनी केलं होतं.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण त्यानंतर खुद्द शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर अजित पवारांनीही स्पष्टीकरण देत या सर्व चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तरी या चर्चा थांबायचं नाव घेत नसतानाच शरद पवारांनी महाविकास आघाडीबाबत केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं होतं. पण अखेर आज शरद पवारांनीच आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण देत माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असल्याचं स्पष्टीकरण दिलं.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT