Nilam Gorhe on Maharashtra Politics: परिस्थितीनुसार दिशा बदलावी लागते; नीलम गोऱ्हेंचे सूचक वक्तव्य

Nilam Gorhe news | राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे.
Nilam Gorhe news
Nilam Gorhe newsSarkarnama
Published on
Updated on

Nilam Gorhe on Maharashtra Politics: राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. एकीकडे सर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधात लढण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. पण महाराष्ट्रात मात्र काही तरी वेगळ्याच घडामोडींना वेग आल्याची चर्चा आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकारण ढवळून निघालं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अमरावतीतील विधानानेही राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत आपली भूमिका मांडली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात काय होणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे, यावर बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहे. पण कोणाला पटेल की नाही माहिती नाही, पण काही प्रश्नांची उत्तरं नियती आणि देव ठरवत असतो. ती उत्तर आपोआपच मिळतात. आपण कितीही प्रयत्न केला तरी अनेक शक्यता आहेत. जवळपास सात-आठ शक्यता आहेत. त्या शक्यतांवर आज बोलणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्यासारखं आहे. असं मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं. (Maharashtra Politics)

Nilam Gorhe news
AAP Councilor Sunita Joins BJP : महापौर निवडणुकीपूर्वीच केजरीवालांना झटका ; AAP नगरसेविका भाजपमध्ये..

दूरगामी परिणामांचा विचार करून कधी उत्तर मिळेल? मिळणार आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे. राज्यात जी अनिश्चितता निर्माण झालीये त्यामुळे राज्यातल्या लोकशाहीचं वातावरण भुसभुशीत होतय की काय, त्यात विकासाचे सर्व विषय मागे पडत असल्याची काळजीही वाटत आहे. महाराष्ट्रात काहीही होऊ शकत. लोकांनी आता जे काही होईल त्याला समोर जाण्याची तयारी ठेवण हे क्रमप्राप्त असल्याचं त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, हे महाविकास आघाडीचे शिल्पकार. परिस्थितीनुसार आघाड्या निर्माण होत असतात. परिस्थिती बदलली की बदल होत असतो. हा राजकारणाचाच एक भाग आहे. काय होईल आणि काय नाही होईल हे आता आपण ठरवण्यापेक्षा समोर काय येतय त्या परिस्थितीनुसार, तुम्हाला दिशा बदलावी लागते. परिस्थितीनुसार प्रत्येकाला स्वत:ची सुरक्षितता बदलावी लागते आणि हा प्रत्येकाचा अधिकार आहे.

Nilam Gorhe news
CR Kesavan Join BJP: काँग्रेसला पुन्हा मोठा झटका? राजगोपालाचारी यांचे पणतू सीआर केसवन यांचा भाजपमध्ये प्रवेश

शिंदे गटातील अस्वस्थ नेत्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे असतील का,यावर बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, या सर्वांमागे सुत्रधार कोण आहे. त्यांची काय भूमिका आहे. काय होईल किंवा काय नाही, ज्यांना काम करायची इच्छा आहे, त्या सर्वांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे राहतील.पण हेतूनुसार निर्णय घ्यावा लागतो. (Shinde-Thackeray Politics)

संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याबाबत लिहीलेला लेख हा महत्वाचा दुवा ठरला होता. यावर बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, संजय राऊत हे समर्थ नेते, लेखक आणि पत्रकार याच स्पष्टीकरण मी देणं योग्य नाही. पण त्यांना जे दिसत ते ते मांडतात. त्यांना दिसलं ते हिताच्या दृष्टीने मांडलं. त्यांचा हेतू काही वाईट असेल असं मला वाटतं नाही.

Nilam Gorhe news
Himachal Pradesh : निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका ; नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत विधानसभेच्या अध्यक्षांकडे हे प्रकरण सोपवंलं जाईल, अशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत काय होऊ शकतं. अध्यक्ष म्हणजे विधानसभेचे ते अध्यक्ष आणि मी परिषदेची उपसभापती आहे. सुप्रीम चार्ज माझ्याकडे आहे. पण जर न्यायालयाने एखादी जबाबदारी टाकली तर नियमांचा अधीन राहून योग्य निर्णय घेण्यासाठी ती जबाबदारी दिलेली असते. त्यासाठी न्यायालय आणि अध्यक्ष सक्षम आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com