MLA Sunil Kedar  Sarkarnama
मुंबई

MLA Sunil Kedar: मोठी बातमी! काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द

Nagpur NDCCB Bank : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदारांना पाच वर्षांची शिक्षा झाली.

Ganesh Thombare

Mumbai News: काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सहकारी बँक (NDCC) घोटाळा प्रकरणात दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली. यानंतर आता सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सुनील केदारांना मोठा धक्का बसला आहे.

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी न्यायालयाचे आदेश विधिमंडळाला पाठवले होते. यानंतर आता सुनील केदारांची आमदारकी रद्द करण्यात आली.

कोणत्याही खटल्यात दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. केदार यांना झालेल्या शिक्षेचा कालावधी पाच वर्षांचा असल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केदार यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना मायग्रेनचा त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सुनील केदार हे काँग्रेसचे विदर्भातील दिग्गज नेते आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडवारच केदारांवर ही कारवाई झाल्यामुळे काँग्रेससाठी देखील हा धक्का मानला जात आहे.

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना पाच वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेसह 12.50 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. जिल्हा बँक घोटाळा प्रकरणाचा निकाल तब्बल 22 वर्षांनंतर लागला. या प्रकरणात सुनील केदार यांच्यासह सहा जणांना ही शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणातून तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT