bhagat singh koshyari, Nana Patole
bhagat singh koshyari, Nana Patole sarkarnama
मुंबई

'भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल नसून 'भाजप'पाल झाले आहेत'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली (Mahavikas Aghadi Government) तीन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Sing Koshyari) हे राज्यपाल राहिले नसून ते 'भाजप'पाल झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या, अश्या शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यपाल कोश्यारींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी विधिमंडळ आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल महोदयांना भेटून त्यासंदर्भात कळवण्यातही आलेले आहे. परंतु अद्याप राजभवनवरून अध्यक्षपदाच्या निवडणुक कार्यक्रमासंदर्भात प्रतिसाद आलेला नाही. आघाडीतील तीन्ही पक्षांनी याविषयी चर्चा केली आहे. सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून राज्यपाल महोदयांना पुन्हा याबाबत संदेश दिला जाईल. आमचा उमेदवार निश्चित झालेला आहे. एकदा का निवडणूक प्रक्रिया सुरु झाली की नावही जाहीर करू, असे पटोलेंनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये खटके उडत आहेत. प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष पटोलेंची नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर निवडणूक होणार का याबाबत प्रश्ननिर्माण झाले आहे. त्यामध्ये आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शविला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत ९ मार्चला राज्य सरकारने राज्यपाल कोश्यारींना पत्र पाठविले होते. मात्र, या पत्राचे राज्यपालांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यानंतर स्मरणपत्रही देण्यात आले. मात्र यावरही राज्यपालांकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे महाविकास आघाडीकडून राज्यपालांवर टीका करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT