Nana Patole Sarkarnama
मुंबई

Nana Patole: हर्षवर्धन सपकाळांविरोधात पक्षांतर्गत नाराजी! नाना पटोलेंना थेट दिल्लीतून हायकमांडचा आदेश

Nana Patole: या बैठकीला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हायकमांडनं दिल्लीला तातडीनं बोलावलं आहे.

सरकारनामा ब्युरो

दिल्लीमध्ये सध्या काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची बैठक सुरु आहे. या बैठकीला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हायकमांडनं दिल्लीला तातडीनं बोलावलं आहे. या बातमीला खुद्द पटोलेंनी पुष्टी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात पक्षांतर्गत नाराजी असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. यापार्श्वभूमीवर पटोलेंना आलेलं हे बोलावणं महत्वाचं आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात पक्षांतर्गत नाराजी आहे, काही दिवसांपूर्वी त्यांच्याविरोधात काँग्रेसच्याच नेत्यांनी आंदोलनं केली होती. पुण्यात अरविंद शिंदे यांनी सपकाळांची थेट हायकमांडला पत्र लिहिलं होतं. त्यामुळं एक मोठी खळबळ उडाली होती. यापार्श्वभूमीवर दिल्लीत सध्या सुरु असलेलं प्रदेशाध्यक्षांची बैठक आणि या बैठकीला माजी प्रदेशाध्यक्ष असेलल्या नाना पटोले यांना बोलावल्यानं आता त्याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, नाना पटोलेंना दिल्लीला बोलावल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना नाना पटोले यांनी उद्या सकाळी आपण दिल्लीला जात आहोत, असा खुलासाही केल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. त्यामुळं आता उद्या पटोले दिल्लीला गेल्यानंतर तिथं काय घडामोडी घडतात त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेमकी काय स्थिती आहे, हे स्पष्ट होऊ शकेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT