Meenakshi Natarajan: मध्य प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या अर्ज भारण्याच्या प्रक्रियेत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्या नाट्यमयरित्या घडामोडी घडल्या आहेत, त्यामुळं खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज निवडणूक आयोगानं बाद ठरवला आहे, त्यामुळं सहाजिकचं ही निवडणूक भाजपच्या उमेदवारासाठी सोपी होणार होती, पण आता यामध्ये एक ट्विस्ट आला आहे. त्यामुळं ही निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचं दिसतं आहे.
काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांनी यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुप्रीम कोर्टानं दखल घेतली असून यावर उद्या सुनावणी केली जाणार आहे. वरिष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायमूर्ती पी. के. शर्मा आणि न्या. अतुल एस. चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर मांडलं आणि ही खरोखरच अत्यंत तातडीची याचिका असल्याचं कोर्टाला सांगितलं. त्यामुळं याला लवकरात लवकर सुनावणीला घेण्याची विनंती केली किंवा मग यावर किमान एक ओळीची अंतरिम ऑर्डर द्यावी अशी विनंती केली. या विनंतीची कोर्टानं दखल घेतली आणि उद्याच यावर सुनावणी घेण्यात येईल असं सांगितलं.
या याचिकेत म्हटलं की, निवडणूक आयोगाच्या रिटर्निंग ऑफिसरनं चुकीच्या पद्धतीनं मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद केला आहे. यामध्ये नटराजन यांच्याविरोधात एक फौजदारी खटला प्रलंबित असल्याची माहिती लपवण्यात आल्याचं कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. पण हा फौजदारी खटला नसून केवळ एक समन्स असल्याचं सिंघवी यांनी याचिकेत म्हटलं आहे, याची दखलही रिटर्निंग ऑफिसरनं अर्ज बाद करताना घेतलेली नाही. यामध्ये रिटर्निंग ऑफिसरची कृती ही बेकायदा, अनियंत्रित आणि पूर्वग्रह मनात ठेवून केलेली कृती आहे. याच भावनेतून त्यांनी मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला, असा आरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे.
दरम्यान, बुधवारी दहा सदस्यांचं एक शिष्टमंडळ नवी दिल्लीत निवडणूक आयोगाला जाऊन भेटलं. यावेळी या शिष्टमंडळानं मिनाक्षी लेखी यांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली तसंच चुकीच्या पद्धतीनं त्यांचा अर्ज बाद करण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडं करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.