Nana Patole
Nana Patole  Sarkarnama
मुंबई

Nana Patole News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलणार का?; नाना पटोले म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Nana Patole ON Congress President Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवसस्थानी पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर आता काँग्रेस प्रदेशाध्य यांनी एका मराठी वृत्तवाहीनीशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. तसेच भाजपचं पतन करणं हाच आमचा एकमेव उद्देश आहे.याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे नाना पटोले यांनी म्हंटले आहे.

नाना पटोले म्हणाले, "राहुल गांधींच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास दाखवला आहे. राहुल गांधींनी प्रेमाचा संदेश दिला आहे. आणि तो कर्नाटकच्या जनतेला ते पसंत पडले. कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या नियोजनावर चर्चा झाली. भाजपचा पतन करणं हाच आमचा एकमेव उद्देश आहे. कोणत्या जागा कुणी लढाव्यात याबाबत चर्चा झाली. याच्या तयारीला महाविकास आघाडी कामाला लागली आहे. "

"कर्नाटकचे जे मुख्यमंत्री होतील त्यांचा सत्कार पुण्यात घ्यायचा आम्ही ठरवला आहे. पुण्यातच वज्रमूठ सभा घ्यायची हे ठकलं आहे. जे कुणी भाजपच्या (BJP) विरोधात लढायला तयार आहेत, त्या सर्वांना सोबत घेणं, ही काँग्रेसची भूमिका आहे, अशी माहिती नाना पटोलेनी दिली.

"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकार मुद्दामून लावत नाही. प्रशासक आणि राज्य सरकार यांच्या राजमुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये बोजवारा उडाला आहे, लोकांची कामे होत नाहीत. राज्य सरकार स्थानिका स्वराज्य संस्थांचा पैसा लुटत आहे. त्यामुळे निवडणुका कशा लावता येतील हे पाहिलं पाहिजे," असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार, मुंबईचे अध्यक्ष बदलणार अशी चर्चा आहे, तुमच्या दिल्लीवारी ही घडून येत आहेत, या प्रश्वावर नाना पटोल म्हणाले,"कोणताही बदल करण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींना आहे. आताच्या परिस्थितीत काही बदल होईल असं मला वाटत नाही, अशी स्पष्टोक्ती नाना पटोलेंनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT