Nana Patole On Modi Sarkarnama
मुंबई

Nana Patole On Modi : शरद पवारांना ऑफर देणे याचा अर्थ मोदींचा पराभव निश्चित; नानांनी डिवचंल!

Chetan Zadpe

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना एनडीएमध्ये येण्याची जाही ऑफर दिली आहे. शरद पवार यांनी नुकतेच प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील अशी भविष्यवाणी केली होती. यावर मोदी यांचे हे ताजे वक्तव्य आले आहे. काँग्रेसमध्ये जावून मरण्यापेक्षा आमच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत या, असे मोदी म्हणाले. आता यावर काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रीया दिली आहे. (Latest Marathi News)

नाना पटोले म्हणाले, "मोदींनी आज नंदुबबारमध्ये जाहीर केलं असतं, आम्ही पुन्हा सत्तेत येत नाही. तरी त्यांना महाराष्ट्राने माफ केलं असतं. या ठिकाणी येऊन ज्यांना नकली म्हणायचं, पण त्यांनाच आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करायचा, याचा अर्थ मोदी सत्तेच्या बाहेर जात आहेत, हे स्पष्ट आहे. राहुल गांधी म्हणाले इंडिया आघाडीचं सरकार आता येणार आहे, त्याला मोदींनी एकप्रकारे दुजोरा दिलेला आहे, असं मोदींचं वक्तव्य आहेृ.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नकली संतानवर मोदींवर टीका -

"हास्यास्पद आहेत, बाळासाहेबांना वरून आणावे लागेल, उद्धव ठाकरेंचा डीएनए तपासावे लागेल, एवढ्या खालच्या पातळीवर जर प्रधानमंत्री बोलत असतील तर काय म्हणावे, कोणाच्या मुलाबद्दल आणि वडिलांबद्दल बोलणे ठीक नाही, वैयक्तिक नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणून ठीक आहे, पण प्रधानमंत्री म्हणून ठीक नाही,असे पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT