Mira-Bhayandar Non Marathi Mayor Controversy sarkarnama
मुंबई

Non Marathi Mayor : अमराठी महापौरचा वाद पेटला, नरेंद्र मेहता यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, 'जे मराठी व्यक्तींना जमले नाही...'

Mira-Bhayandar Non Marathi Mayor Controversy : मराठी अमराठी वाद पेटला आहे. भाजपने अमराठी महापौर दिल्याचे सांगत मनसे, मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. त्यांना भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सरकारनामा ब्यूरो

प्रकाश लिमये

Mira-Bhayandar News : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी होत असलेल्या निवडणूकीवरून राजकारण पेटले आहे. भाजपला एकहाती बहुमत या महापालिकेत आहे. त्यांनी महापौर पदासाठी डिंपल मेहता यांना उमेदवारी दिली आहे. त्या आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी आहेत. त्यातच भाजपने महापौर पदासाठी अमराठी उमेदवार दिल्याचा निषेध म्हणून मराठी एकीकरण समिती व मनसेकडून महापौर निवडणुकीच्या दिवशी आज मोर्चा काढण्यात येणार आहे

भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मराठी समिती आणि मनसेने घेतलेल्या भूमिकेला प्रत्युत्तर  दिले आहे. ते म्हणाले, 'महापौर पदासाठी विरोधी पक्षांनी देखील अमराठी उमेदवार दिला आहे. मात्र समिती व मनसे ययाबद्दल एक शब्दही बोलत नाहीत.डिंपल मेहता यांचे कुटुंब गेल्या ७० वर्षांपासून मुंबईत राहात आहेत.

'आपण स्वतः ४८ वर्षे मिरा भाईंदर मध्ये राहत आहोत. एखाद्या व्यक्तीला मराठी होण्यासाठी आणखी किती काळ हवा. डिंपल मेहता यांनी याआधी महापौर असताना मराठी माणसांशी संबंधित अनेक कामे केली आहेत जी मराठी व्यक्तींना जमली नाहीत. त्यामुळे ही केवळ राजकीय खेळी आहे.', असा पलटवार मेहता यांनी केला आहे.

मराठी आंदोलन पेटणार

माहिती मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख व मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकीत अनेक स्थानिक आगरी, कोळी महिला निवडून आल्या आहेत. असे असताना भाजपने अमराठी महिला उमेदवाराला महापौर पदाची संधी दिली आहे. समितीने केलेली मागणी डावलून ही निवड झाली असल्याने या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असून आम्ही मोर्चा काढणार आहोत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT