Vasai Virar Politics: वसई विरार महापालिकेत 'शिट्टी'च्या धाकानं 'कमळ' अज्ञातवासात; भाजपचे 43 नगरसेवक अज्ञातस्थळी

Vasai Virar Municipal corporation politics : आतापर्यंत राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात ऑपरेशन लोटस हे वाक्य बोलले जात होते. परंतु, यावेळी पहिल्यांदाच वसई विरारमध्ये ऑपरेशन शिट्टीच्या धाकानं भाजपचं ‘ऑपरेशन लोटस’ अज्ञातवासात गेल्याची चर्चा सुरू आहे.
Vasai-Virar Mahapalika 2026 Bahujan Vikas Aghadi
Vasai-Virar Mahapalika 2026 Bahujan Vikas Aghadisarkarnama
Published on
Updated on

Vasai Virar News: आतापर्यंत राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात ऑपरेशन लोटस हे वाक्य बोलले जात होते. परंतु, यावेळी पहिल्यांदाच वसई विरारमध्ये ऑपरेशन शिट्टीच्या धाकानं भाजपचं ‘ऑपरेशन लोटस’ अज्ञातवासात गेल्याची चर्चा सुरू आहे. वसई विरार महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये 115 सदस्यांच्या महापालिकेत बहुमतासाठी 58 नगरसेवकांची आवश्यकता असताना भाजपला केवळ 43 नगरसेवकांवर समाधान मानावे लागले.

भाजपनं राज्यभरातच नव्हे तर देशभरात ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे फोडाफोडी, खरेदी-विक्री आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप नेहमीच केला जातो. सत्ता, पैसा आणि यंत्रणांच्या जोरावर काहीही करता येते, हा समज वसई विरारमध्ये मात्र चाललेला नाही. पण अशातच आता भाजपच्या सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवल्याचे दिसून येत आहे.

उद्या येत्या 3 फेब्रुवारी रोजी महापौर निवड होणार असून त्या दिवशी सभागृहातील वास्तविक संख्याबळ स्पष्ट होणार आहे. तब्बल 15 नगरसेवक कमी असतानाही भाजपने महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आजच्या वेळी बहुजन विकास आघाडीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक खुलेपणाने, निर्भयपणे आपापल्या प्रभागात लोकसेवेत कार्यरत आहेत.

याउलट भाजपने आपल्या सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवले आहे, अशी माहिती मिळत आहे. ही भीती कुणाची? बहुजन विकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असताना भाजपचे हे कृत्य म्हणजे 'आपल्याच नवनिर्वाचित नगरसेवकांवर दाखवलेला अविश्वास नाही का? असा प्रश्न भाजपच्याच गोटात केला जात आहे.

Vasai-Virar Mahapalika 2026 Bahujan Vikas Aghadi
Ajit Pawar CM post : राष्ट्रवादीअंतर्गत कटकारस्थान, अजित पवारांची एकदा नव्हे दोनदा..; माजी मंत्री पाचपुतेंच्या दाव्यानं खळबळ

वसई तालुक्यात निवडणूक प्रचार संपल्यानंतर सत्ताधारी असोत वा विरोधक, सर्वजण सलोख्याने जनतेच्या सेवेत रुजू होतात. हा येथील राजकीय इतिहास आहे. मात्र यावेळी प्रथमच ‘ऑपरेशन लोटस’च्या नावाखाली विनाकारण राजकीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवकांपैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतांश नगरसेवक हे मूळचे बिगर-भाजपाई आहेत. असे असताना संख्याबळाचा कोणताही ताळमेळ नसताना त्यांना अज्ञातस्थळी ठेवणे म्हणजे स्थानिक भाजप नेतृत्वाचा त्यांच्यावरचा उघड अविश्वासच म्हणावा लागेल.

Vasai-Virar Mahapalika 2026 Bahujan Vikas Aghadi
Ajit Pawar NCP: अजितदादांचं अपघाती निधन, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वाढल्या; घेतला मोठा निर्णय

नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपल्या प्रभागात कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून लोकसेवेत कार्यरत राहणे अपेक्षित असते. मात्र, भाजपचे सर्व नगरसेवक अज्ञातस्थळी बंदिस्त आहेत. महिला नगरसेवकांना त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर ठेवण्यात आले आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. 3 फेब्रुवारीपर्यंत आपले नगरसेवक सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांकडे वळू नयेत, या भीतीपोटीच हा सारा प्रकार सुरू असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

Vasai-Virar Mahapalika 2026 Bahujan Vikas Aghadi
PCMC Mayor: मोठी बातमी: पिंपरी चिंचवडच्या महापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला; भाजपनं तगडा राजकीय अनुभव असलेल्या नेत्याला दिली संधी

आवाक्याबाहेरची मुखमखलाशी करणारे स्थानिक भाजप नेतृत्व या ऑपरेशन लोटसच्या खेळात आज तोंडघशी पडलेलं दिसून येत आहे. काही असले तरी यावेळी प्रथमच 'ऑपरेशन शिट्टी'च्या डंकामुळे लोटसला अज्ञातवासात जावे लागले आहे.यामुळे आता या भागात 'ऑपरेशन लोटस'ची भीती राहिली नसल्याचं दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com