Narendra Modi, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Modi and Eknath Shinde : मोदींच्या पावलावर शिंदेंचं पाऊल

सरकारनामा ब्यूरो

पंकज रोडेकर

Eknath Shinde Thane News :

राज्यासह देशात चर्चा आहे ती अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराची. आता त्यात आणखी दोन मंदिरांची वाढ झाली आहे. पहिले मंदिर आहे नाशिकमधील श्री काळाराम मंदिर (Kalaram Mandir) देवस्थान आणि दुसरे ठाण्यातील श्री कौपिनेश्वर मंदिर (Kopineshwar Mandir). या दोन्ही मंदिरांमध्ये एक अशी घटना घडली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जोडणारा समान धागा ठरली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (12 जानेवारी) नाशिकचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काळाराम मंदिराच्या प्रांगणात हाती पोचा घेत साफसफाई केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ठाण्यातही आज तसेच घडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री कौपिनेश्वर मंदिरात पोचा घेत सफाई केली.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील श्री कौपिनेश्वरला गेले. तिथे त्यांनी अभिषेक केला. मोदींनी जशी काळाराम मंदिरात आरती केली, तशीच आरती मुख्यमंत्री शिंदे यांनी कौपिनेश्वर मंदिरात केली.

या दोन्ही व्हिडीओंवरून एक बाब स्पष्ट झाली, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाऊल टाकत आहेत. शिंदेंची भाषणाची स्टाईलदेखील मोदींप्रमाणे विकसित होत आहे. एकनाथ शिंदे मोदींप्रमाणेच जनमानसात त्यांची प्रतिमा तयार करीत आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी महादेवाला अभिषेक करून आरती केल्यानंतर स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. त्यावेळी हातात झाडू घेऊन झाडलोट केली. त्यानंतर सभामंडपात येऊन हाती पोचा घेत साफसफाई केली. यावेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि महापालिका अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापूर्वी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी चर्चा केली जात असे. मात्र, आता वेगळे चित्र दिसते. देशात नरेंद्र मोदी जाहीरपणे जसे बोलतात, कृती करतात त्याचं अनुकरण एकनाथ शिंदे करताना दिसतात. काल पंतप्रधान मोदींनी नाशिकहून मुंबईला येताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांना घेतले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर पंतप्रधान मोदींचा वरदहस्त असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

(Edited Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT