Modi-Fadanavis Dressing : नरेंद्र-देवेंद्र 'एक रंग में रंग जाए' : नाशिकमध्ये मोदी-फडणवीसांच्या जॅकेटची चर्चा!

Modi-Fadnavis Nashik Raod Show : मोदींप्रमाणेच उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उंची पोशाखाचे शौकीन आहेत.
Narendra Modi-Devendra Fadnavis
Narendra Modi-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi Nashik Tour News : पंतप्रधान नरेंद्र मोदी... देशात आणि जगातही लोकप्रियेतच्या शिखरावर असलेले नाव... मोदींनी आपल्या स्टाईलने काही आयकॉन, ब्रॅंड तयार केले आहेत... जसं की मोदी जॅकेट... मोदी कुर्ता... मोदींचा पेहराव हा कायमच क्लासिक असतो. महागड्या कपड्यांवरून मोदी अनेकदा टीकेचेही धनी झाले. मात्र, त्यांनी आपली कपड्यांची क्लासिक स्टाईल जपली आहे. मोदींप्रमाणेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उंची पोशाखाचे शौकीन आहेत. नाशिकच्या आजच्या दौऱ्यातही मोदी यांच्या जॅकेटसोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जॅकेटही विशेष लक्षवेधी ठरले. विशेष म्हणजे दोघांचेही जॅकेट एकाच रंगाचे होते. (Modi-Fadnavis's jacket discussion in Nashik's 'road show'!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार सहभागी झाले होते. नाशिकमध्ये मोदींसोबत हे तिघेही ‘रोड शो’मध्ये सहभागी झाले होते. मात्र, विशेष चर्चा रंगली होती. ती मोदी आणि फडणवीस यांच्या जॅकेटची. या दोघांचेही जॅकेट एकाच रंगाचे आणि क्लासिक होते, त्यामुळे रंगात रंगले नरेंद्र-देवेंद्र असे शब्द आपसूकच ओठांवर येत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi-Devendra Fadnavis
PM Narendra Modi : मोदींनी जिंकली नाशिककरांची मने...! डॉ. भारती पवारांनी सांगितले कारण...

मोदी यांचे कपड्यांवरील प्रेम हे काही नवीन नाही. विशिष्ट ड्रेस, त्यांचा रंग, स्टाईल याबाबत मोदी कमालीचे दक्ष असतात. त्यातूनच त्यांनी कपड्यांची एक स्टाईल निर्माण केली आहे. पूर्वी पूजा किंवा सणासुदीला आपल्याकडे कुर्ता आणि पायजमा घातला जायचा. पण, मोदींनी कुर्ता आणि पायजम्याची स्टाईलच बदलून टाकली. आज अनेकजण दररोजही कुर्ता-पायजमा घालताना दिसतात. मोदींचे हाफ स्लीव्ह कुर्तेही लोकांना इतके भावले की, लोकही तसेच कुर्ते घालू लागलेत, त्यामुळे त्या कुर्त्यांना 'मोदी कुर्ते' असे म्हटले जाऊ लागले.

मोदी मोनोग्रामचा सूट

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यावर आले होते, त्यावेळी मोदी नावाचा मोनोग्राम सूट पंतप्रधानांनी घातला होता. त्या सुटावर सुवर्णाक्षरांनी मोदी असे लिहिले होते. त्यावरून मोदींवर देशभरातून प्रचंड टीका झाली होती. त्या वेळी त्याची किंमत दहा लाख रुपये सांगितली जात होती. मोदी मोनोग्राम सुटाचा जेव्हा सुरतमध्ये लिलाव करण्यात आला, त्या वेळी त्याला हिरे व्यापारी हितेश पटेल यांनी सर्वाधिक ४ कोटी ३१ लाखांची बोली लावून खरेदी केला होता. त्यांनी तो सूट आपल्या कारखान्यात ठेवला आहे.

Narendra Modi-Devendra Fadnavis
Modi Nashik Tour : काळाराम मंदिरात मोदींचा अखंड भारतासाठी संकल्प...

आपल्या लूकवर मोदी अनेक प्रयोग करतात. भारतीय पोशाखासह ते पाश्चात्य पोशाखही उत्तम प्रकारे कॅरी करतात. अनेकदा मोदींनी टेक्सन टोपी आणि ट्रेंच कोट घातलेला दिसतो. ज्यामध्ये त्यांचा लूक लक्षवेधी आणि क्लासिक ठरतो. कुर्ता-पायजम्याबरोबरच मोदी हे जॅकेटबाबतही प्रचंड सजग आहेत. नुकत्याच झालेल्या ‘अहमदाबाद शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये त्यांनी गुजरात खादी ग्रामोद्योग बोर्डाच्या स्टॉलवरून काही कपडे खरेदी केले. काही जॅकेटेही त्यांनी इथून खरेदी केली.

Narendra Modi-Devendra Fadnavis
Modi Vs Shinde : मोदींच्या दौऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही; सुशीलकुमार शिंदेंनी फुंकले रणशिंंग

एक लाख 34 हजारांची शाल

मोदींच्या अंगावर बऱ्याचदा शालही दिसून येते. त्या शालीचा किस्साही गाजला होता. गुजरात विधानसभेच्या 2022 च्या निवडणुकीत मतदान करण्यापूर्वी मोदी हे आपल्या आईला भेटायला गेल होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर असलेल्या शालीवरून जोरदार चर्चा रंगली होती. कारण, त्या शालीची किंमत तब्बल 1 लाख 34 हजार रुपये असल्याचं त्यावेळी म्हटलं जात होतं. स्वतःला फकीर म्हणवून घेणाऱ्या मोदींकडे इतके पैसे कुठून आले, असा सवाल विचारला गेला होता.

पश्मिना शाल

मोदी हे बऱ्याचदा पश्मिना शाल परिधान करतात. ही शाल जगातील सर्वांत बारीक धाग्यांनी विणली जाते. ही शाल विणण्यासाठी 15 ते 20 दिवस लागतात. या पश्मिना शालीचे वजन 150 से 180 ग्रॅमपर्यंत असते.

Narendra Modi-Devendra Fadnavis
Solapur News : भाजपवाले यापुढे मतदानही होऊ देतील की नाही, ही शंकाच : काँग्रेस नेत्याने व्यक्ती केली भीती

ज्याप्रमाणे देशात मोदी हे क्लासिक पेहरावात दिसतात, त्याचप्रमाणे राज्यात देवेंद्र फडणवीसही कायम सुटा-बुटात दिसतात. आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे मोदी आणि फडणवीस हे एकाच रंगाचे जॅकेट परिधान करून नाशिकमध्ये ‘रोड शो’मध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे मोदी आणि फडणवीस यांच्या जॅकेटची ‘रोड शो’मध्ये चर्चा सुरू होती.

R...

Narendra Modi-Devendra Fadnavis
Raver Loksabha : रक्षा खडसेंना उमेदवारी नाकारण्याचे धाडस भाजप दाखवेल का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com