Raut Vs Modi : काळाराम मंदिरात मोदींच्या साफसफाईवर राऊतांचा टोला, म्हणाले 'याचा अर्थ असा की..'

PM Modi In Kalaram temple : 'नाशिकला काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले, आनंद आहे! पण दर्शन झाल्यानंतर...' असंही राऊत म्हणाले आहेत.
Raut Vs Modi
Raut Vs ModiSarkarnama
Published on
Updated on

PM Modi In Nashik : राष्ट्रीय युवा अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) शुक्रवारी नाशिक शहरात आले होते. भव्य रोड शोनंतर ते काळाराम मंदिरात गेले आणि तिथे त्यांनी साफसफाईसुद्धा केली. तसेच हाच संदेश त्यांनी जाहीर सभेमध्येसुद्धा दिला. 22 जानेवारीपर्यंत आपल्याजवळच्या मंदिरांमध्ये स्वच्छता करण्याचे आवाहन त्यांनी यापूर्वीच केले होते. दरम्यान मोदींच्या या साफसफाईवर ठाकरे गटाकडून त्यांना टोला लगावला गेला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले, 'पंतप्रधान येणार म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते 5 दिवसापासून साफसफाई करत होते. त्यांनी मंदिर एकदम चकाचक केले. या कामासाठी 8 ते 10 लाख खर्च केले. मंदिर ट्रस्टने देखील सफाई वर 2 ते 4 लाख खर्च केल्याचे समजते. अनेक ठिकाणी फरशीवर लाल गालिचे टाकले होते. तरीही आपल्या पंतप्रधान महोदयांनी हाती मॉप घेऊन सफाई दर्शन केलेच! याची खरंच गरज होती काय? याचा अर्थ असा की सरकारने सफाईवर खर्च केलेले 10-12 लाख रुपये वाया गेले.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raut Vs Modi
Narendra Modi In Nashik : झाडू मारता मारता देशाला लुटले; पंतप्रधान मोदींवर ठाकरे गटाची बोचरी टीका

याशिवाय 'पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) नाशिकला काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले, आनंद आहे! पण दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ काढून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांनी भेटायला पाहिजे होतं . नाशिक जिल्हा हा देशातील सर्वात मोठं कांदा उत्पादक जिल्हा आहे, पण कांदा निर्यात बंदीमुळे इथला शेतकरी पार कोलमडून पडलाय. पंतप्रधान या शेतकऱ्यांना का भेटले नाहीत?' असा सवालही राऊतांनी केला आहे.

तसेच 'राजकारण करायला वेळ आहे, पण देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत. भाजपला केवळ धर्माच्या नावावर राजकारणाची भाकरी भाजण्याचं काम येतं.हे पुन्हा एकदा सिद्ध झाले!' असं म्हणत राऊतांनी भाजपवरही(BJP) टीका केली.

Raut Vs Modi
Modi Nashik Tour : काळाराम मंदिरात मोदींचा अखंड भारतासाठी संकल्प...

तर मोदींच्या साफसफाईच्या मुद्य्यावरून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीही टीकेची झोड उठवली. दोन दिवसांपासून शहरात स्वच्छता केली जाते आहे. काळाराम मंदिर दोन दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. अशावेळी मोदींनी तेथे साफसफाई करून काय मिळवले? असा प्रश्न करंजकरांनी उपस्थित केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com