Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Narendra Modi : ...म्हणून भाषण संपताच मोदींनी तडकाफडकी सोडलं स्टेज

Mumbai Trans Harbour Link Inauguration : स्टेजवरील कुणाकडेही न पाहात मोदी तडक बाहेर पडल्याने चर्चांना उधाण

Sunil Balasaheb Dhumal

BJP Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून शाब्दीक कोटी करून विरोधकांना जेरीस आणतात. अचूक शब्द आणि टायमींग साधत मोदी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देतात. भाषणात आपल्या सहकाऱ्यांचे तोंडभरून कौतुकही करतात. तसेच भाषणानंतर व्यासपीठावरील प्रत्येकाला हात जोडून प्रतिसाद देतात. कधीकधी विचारपूसही करतात. आज मात्र मोदी आपले भाषण आटपून स्टेजवरून लगबगीने थेट खाली उतरल्याचे दिसले. यावेळी त्यांनी कुणाकडेही लक्ष दिले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच 'अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा-शेवा-अटल सेतू'चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. दरम्यान कार्यक्रम स्थळी मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हटके एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले. फडणवीस आणि पवारांनी आपले भाषण थोडक्यात आटोपले. मुख्यमंत्री शिंदेंनी नेहमीप्रमाणे बॅटींग केली. त्यानंतर मोदी काय बोलणार याकडे लक्ष लागले होते.

नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. त्यानंतर देशात सुरू असलेले सर्व प्रकल्प हे नवा भारत निर्मितीसाठी असल्याचे ठासून सांगितले. महिलांसाठी सुरू असलेल्या सर्व योजानांचा माहिती देत महिला कल्याण हे भाजप शासित सरकारची गॅरंटी असल्याचे सांगितले. त्यांनी सर्व क्षेत्रातील कामांचा जलद गतीने आढावा घेतला. तसेच अटल सेतू मुंबईकरांच्या सेवेत लोकार्पण केल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जास्त टीका करण्याचे टाळले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपले भाषण झाल्यानंतर मोदी व्यासपीठावरील सर्वांना प्रतिसाद देतात. प्रत्येकाशी काही शब्द का होईना ते बोलतात. आज मोदींनी उपस्थित महिलांचे आभार मानून भाषण संपवले. त्यानंतर नेहमीप्रमाणे व्यासपीठावरील सर्वांनी उठून त्यांना नमस्कार केला. मोदी मात्र त्यांच्याकडे न पाहता तडक स्टेजवरून खाली उतरले.

दरम्यान, नाशिकमधील कार्यक्रमांना उशीर झाल्याने मुंबईतील कार्यक्रमांच्या वेळांवर परिणाम झाला. दौऱ्याचे वेळापत्रक कोलमडणार असल्याचे लक्षात येताच इतर नेत्यांनी भाषणे थोडक्यात संपवली. त्यातच सूर्यास्तापूर्वी मोदींच्या विमानाचे उड्डाण होणे अपेक्षीत होते. त्यासाठी त्यांना लवकरात लवकर विमानतळावर पोहचणे गरजेचे होते. त्यामुळेच ते भाषणानंतर तडक निघून गेल्याचे समजते. मात्र मोदींनी असे घाईघाईत निघून जाण्याची अन्य काही कारणे आहेत का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT