Congress Boycott Ram Mandir Consecration : सोमनाथ ते राम मंदिराचे लोकार्पण; काँग्रेसने या मोठ्या सोहळ्यांवर बहिष्कार टाकला

BJP Vs Congress Politics : 'ही काँग्रेस महात्मा गांधी यांची नसून नेहरूंची'
Narendra Modi, Congress
Narendra Modi, CongressSarkarnama
Published on
Updated on

Ayodhya Ram Temple Inauguration : काँग्रेसने अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने बुधवारी निवेदन जारी करून हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा असल्याचा आरोप केला आहे. या निर्णयामुळे भाजपने काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. असे असले तरी यापूर्वीही काँग्रेसने अशा धार्मिक सोहळ्यांवर बहिष्कार टाकले आहेत.

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितले की, काँग्रेस वारंवार नकारात्मक राजकारण करत आले आहे. त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीवर बहिष्कार टाकला जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे जनतेनेनी काँग्रेसवर बहिष्कार टाकला आहे. ही महात्मा गांधी यांची नसून नेहरूंची काँग्रेस आहे, अशी टीका करीत त्रिवेदींनी काँग्रेसने बहिष्कार टाकलेल्या सर्व कार्यक्रमांचीही यादीच दिली.

Narendra Modi, Congress
Konkan Development Jumla : 'मालदीव नको; चला कोकण बघू!' हा तर भाजपचा भुलभुलैया...

जानेवारी २०२४ : मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, अधीररंजन चौधरी यांना राम मंदिर ट्रस्टकडून राम मंदिराच्या (Ram Temple) अभिषेक सोहळ्यासाठी निमंत्रण मिळाले होते. मात्र काँग्रेसने या कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

सप्टेंबर 2023 : G-20 शिखर परिषदेदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डीनरचे आयोजन केले होते. त्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना निमंत्रणे दिली होती. मात्र काँग्रेसशासित राज्यांतील नेत्यांसह सर्वच नेते त्यात सहभागी झाले नाहीत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Narendra Modi, Congress
Pune LokSabha Constituency : कसबा पॅटर्न लोकसभा इलेक्शनलाही तारणार; रवींद्र धंगेकरांचा निर्धार पक्का!

मे 2023 : नवीन संसद भवनाच्या (News Parliament) उद्घाटनावर बहिष्कार. मे 2023 मध्ये नवीन संसदेचे उद्घाटन झाले. त्यावरही काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता.

जानेवारी २०२१ : संसदेच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला.

डिसेंबर 2020 : काँग्रेसने संसदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन समारंभावरही बहिष्कार टाकला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ऑगस्ट 2019 : प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देण्यात आला तेव्हा मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) समारंभाला अनुपस्थित होते.

जून 2017 : जीएसटी लागू झाल्यानंतर काँग्रेसने संसदेच्या अधिवेशनावर बहिष्कार टाकला.

2004 नंतर 2009 पर्यंत काँग्रेसने कारगिल विजय दिवसावर बहिष्कार टाकला.

मे 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पोखरण अणुचाचणीनंतर काँग्रेसने 10 दिवस कोणतेही वक्तव्य केले नाही.

1951 : सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमात जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या उपस्थितीच्या विरोधात होते. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Narendra Modi, Congress
Narendra Modi In Nashik : झाडू मारता मारता देशाला लुटले; पंतप्रधान मोदींवर ठाकरे गटाची बोचरी टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com