Naresh Mhaske Alleged Jitendra Awhad
Naresh Mhaske Alleged Jitendra Awhad  Sarkarnama
मुंबई

Naresh Mhaske : 'अजितदादांचे पुतळे जाळा' असे सांगणे ही गद्दारी की खुद्दारी ? ; आव्हाडांना म्हस्केंचा सवाल

सरकारनामा ब्युरो

Naresh Mhaske Alleged Jitendra Awhad : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठेही गेले की सहा महिन्यांपूर्वी आम्ही असेच केले होते अशी शेखी मिरवतात," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच केली आहे. या टीकेला शिवसेनचे नेते, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते ठाण्यात माध्यमांशी बोलत होते.

जितेंद्र आव्हाडांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल करुन त्याच्यावर टीका केली होती. "मुख्यमंत्री कुठे ही गेले की सहा महिन्यांपूर्वी आम्ही असेच केले होते, अशी शेखी मिरवतात. क्रिकेटच्या कार्यक्रमात गेले की म्हणतात, सहा महिन्यांपूर्वी आम्हीही असेच फटकारे मारेले होते. कबड्डीच्या कार्यक्रमाला गेले की म्हणतात, सहा महिन्यांपूर्वी आम्हीही असेचे पाय खेचले होते, खो-खोच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले की मुख्यमंत्री म्हणतात, सहा महिन्यांपूर्वी आम्हीही असेच खो दिले होते, असे सांगत आव्हाड म्हणाले होते.

"सहा महिन्यांपूर्वी तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला होता," ही जहरी टीका आव्हाडांनी शिंदेवर केली होती. ही टीका शिवसेना शिंदे गटाच्या जिव्हारी लागली आहे. आव्हाडांच्या या विधानावर नरेश म्हस्के यांनी पलटवार केला आहे.

"देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केला होता. तेव्हा ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते यांना घेऊन जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या प्रतिमेला काळे फासले होते. त्यांचा पुतळा जाळला होता. त्यावेळी त्यांनी (जितेंद्र आव्हाड) मलाही फोन करुन अजित पवारांचे पुतळे जाळा, त्यांच्या प्रतिमेला काळे फासा असे सांगितले होते. आव्हाडांची ही गद्दारी आहे की खुद्दारी, असा प्रश्ना नरेश म्हस्केंनी उपस्थित केला होता.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केल्याप्रकरणी लोकनेते एकनाथ शिंदे फाऊंडेशनने हा दावा दाखल केला आहे.

मानहानी प्रकरणात काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आता राऊतांवर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे. राऊत या प्रकरणात दोषी आढळले, त्यांनी शिक्षा सुनावण्यात आली तर त्यांचीही खासदारकी रद्द होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT