Defamation Case on Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केल्याप्रकरणी लोकनेते एकनाथ शिंदे फाऊंडेशनने हा दावा दाखल केला आहे.
मानहानी प्रकरणात काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आता राऊतांवर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे. राऊत या प्रकरणात दोषी आढळले, त्यांनी शिक्षा सुनावण्यात आली तर त्यांचीही खासदारकी रद्द होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
समाज माध्यमांवरुन तसेच पत्रकारांशी बोलताना राऊत नेहमीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करीत असतात, त्यांच्याविषयी वादग्रस्त विधानं करीत असतात, त्यामुळे हा दावा दाखल केल्याचं लोकनेते एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष अमर लोखंडे यांनी सांगितले. लोकनेते एकनाथ शिंदे फाऊंडेशनकडून संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. त्यांना १०० कोटींची नोटीसही देण्यात आली आहे.
'मोदी'आडनावावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे काँग्रेसचे नेते, राहुल गांधी यांना आपली खासदारकी गमवावी लागली आहे. सुरत सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०२४ ची निवडणुक ते लढवू शकणार नाही.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे. राहुल गांधी यांच्यापूर्वीही काही लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारची कारवाई केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.