राहुल क्षीरसागर
Naresh Mhaske News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील शीतयुद्धाला आता नवे वळण मिळाले आहे. नाईक यांनी ठाण्यात भाजपच्या एका कार्यक्रमात ठाण्यात सत्ता हवी असेल तर रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल असे विधान केले होते. त्यांचा इशारा थेट शिंदेंकडे होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर खासदार नरेश म्हस्के हे प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी नाईकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे.
'रावण खलनायक का ठरला? कारण त्याने दुसऱ्याच्या पत्नीचं अपहरण केल. नाईकांनी हे विधान एकनाथ शिंदे यांच्यासाठी अप्रत्यक्षपणे वापरले नसून त्यांनी हे विधान स्वतःबद्दलच केले असेल', असा टोला खासदार नरेश म्हस्के यांनी लगावला.
नाईकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर शिवसेनेकडून देखील आक्रमक पवित्रा घेत प्रतिउत्तर देण्यात आले आहे. नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांना इशारा देत म्हटले की, रावणाच्या पावलावर पाऊल ठेवून कोण चाललंय, हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे आम्हाला जास्त बोलायला लावू नका की राम कोण आणि रावण कोण?
ठाणे महापलिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अशातच नुकतेच प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींवरील सुनावणी प्रक्रिया पार पडली. यावेळी देखील विरोधी पक्षांनी एकत्र येत ही प्रभाग रचना एका राजकीय पक्षाला पूरक असल्याचा आरोप केला. त्यात राज्यात सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यात ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संघर्ष अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.
ठाण्यातील वर्तकनगर येथे काही दिवसांपूर्वी भाजप कार्यालय पार पडलेल्या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली. ठाण्यातही सत्ता मिळवून देऊ शकतो. त्यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल, तुम्ही तयार आहात का? त्यास भाजप कार्यकर्त्यांनी देखील प्रतिसाद दिला होता . वरिष्ठ नेते महायुतीबाबत निर्णय घेतील. पण कार्यकर्त्यांचा सन्मान न झाल्यास युतीला पहिला विरोध करणारा मी असेन, असे देखील त्यांनी सांगितले होते. दरम्यान, नाईक यांनी शिंदेंचे नाव न घेता त्यांची रावणशी तुलना केल्याची चर्चा होती. त्यामुळे शिवसेनेदेखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.