Thane Politics : कोर्टाने याचिका फेटाळताच नरेश म्हस्केंनी राजन विचारेंना डिवचले; म्हणाले, 'त्यांच्या सारखा अडाणी लीडर मी नाही'

Naresh Mhaske Vs Rajan Vichare : नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला राजन विचारे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालायने त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर म्हस्केंनी विचारेंवर टीका केली आहे.
naresh mhaske rajan vichare
naresh mhaske rajan vicharesarkarnama
Published on
Updated on

राहुल क्षीरसागर

Naresh Mhaske News : 'राजन विचारे यांना आपली हार पचली नाही. लोकांमध्ये आपली हार पचवता आली नाही, लोकांपासून स्वत:चा चेहरा कसा लपवायचा, याकरिता थातूरमातूर कारणे काढून कोर्टात याचिका दाखल केली. परंतु, पळकुटा बाजीराव अशा पद्धतीने विचारे यांची वागणूक असून मी त्यांच्या सारखा अडाणी लीडर नाही, अशी टीका खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांना लगावला.

राजन विचारे यांनी नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हान देत न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायलयाने फेटाळली. त्यानंतर नरेश म्हस्के यांनी विचारे यांच्यावर टीकेची झोड उठवली. माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब झाले आहे. दोन लाख १७ हजार मतांच्या फरकाने मी निवडून आलो. सात लाख ३४ हजार मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. देशातील पहिल्या दहा जागांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या मतदारसंघात ठाण्याचा समावेश आहे, असे ते म्हणाले.

राजन विचारे यांना आपली हार पचली नाही. आपली हार लपवण्यासाठी त्यांनी थातूरमातूर कारणे काढून कोर्टात याचिका दाखल केली. मात्र, कोर्टाने दूध का दूध, पाणी का पाणी करून दिले आहे. विद्यार्थी दशेपासून पक्षाकरिता आंदोलन केले, लाठ्या- काठ्या खाल्ल्या, हे करत राजकारणात आलो, असे देखील म्हस्के यांनी सांगितले.

naresh mhaske rajan vichare
Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंच्या शक्तिप्रदर्शनाने एका दगडात दोन पक्षी! भाजपमध्ये निर्माण केली अस्वस्थता

तो आरोप जाहीरपणे सांगा...

माझ्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा किंवा चोरीचा गुन्हा नाही. ज्या गुन्हासाठी विचारे माझ्या विरोधात न्यायालयात गेले तो त्यांनी सांगावा. त्यांनी ज्याचा न्यायलयात उल्लेख केला आहे ती पक्षाकरिता केलेली गोष्ट असून ती सांगायला लाज वाटते का? असा सवाल देखील म्हस्के उपस्थित केला. सत्य परेशान हो सकता है, अपराजित हो नहीं सकता, हेच खरे. असल्याचे त्यांनी सांगितले.

आधी आपला पक्ष सांभाळा

संजय राऊत यांच्या सल्ल्याने बालिश चाळे केले जात आहेत. नरेंद्र मोदींचे नाव घेण्याचीही त्यांची पात्रता नाही. आधी आपला पक्ष सांभाळा, असा सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. आपल लावलेले कुंक लोक पुसत आहे, नगरसेवक, पदाधिकारी, आमदार तुमचं रोजचं लावलेलं कुंकू पुसून दुसऱ्याच्या घरी सुखाने नांदायला जात आहेत. आधी आत्मपरीक्षण करा आणि मग पंतप्रधाना कुंकू पाठवा, असे म्हस्के म्हणाले.

naresh mhaske rajan vichare
Uddhav Thackeray News : राज ठाकरेंशी वाढता 'घरोबा', उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? मनसेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com