Naresh Mhaske and Aditya Thackeray  Sarakarnama
मुंबई

Naresh Mhaske : अन् 'आदु बाळ' म्हणत नरेश म्हस्केंनी आदित्य ठाकरेंना लगावला टोला!

Aditya Thackeray : '...तेथील दौरा संपल्यावर कोणासोबत बर्फात मौजमजा केली होती, हेही सांगावे.' असंही म्हस्केंनी म्हटलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

पंकज रोडेकर

Thane News : शिवसेनेच्या फुटीनंतर थेट ठाकरे पितापुत्रांवर टोकाचे टीकास्त्र सोडणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के हे सर्वांना माहीत आहेत. त्याच नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरे यांची चक्क आदु बाळ म्हणून खिल्ली उडवली.

याशिवाय लहानपणी खाऊसाठी भांडायचे तसं आदु बाळ तेव्हा मुख्यमंत्र्याच्या मागे लागून दावोसला गेले होते. तेथे दौरा संपल्यावर कोणासोबत बर्फात मौजमजा करत होते. हेही त्यांनी जाहीर करावे. तसेच येत्या काही दिवसात उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) गटाचे आमदार-खासदार आणि महत्वाचे पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करतील आणि ठाकरे गटाचा सुपडा साफ होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री हे सध्या दावोस दौऱ्यावर असून या दौऱ्यावरुन उध्दव आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून टीका केली जात आहे. त्या टीकेला मंगळवारी ठाण्यात म्हस्के यांनी उत्तर दिले आहे. यावेळी आदु बाळ असा आदित्य ठाकरेंचा(Aditya Thackeray) उल्लेख करून म्हस्के यांनी वास्तविक त्यावेळेस दावोस दौऱ्याला उद्योगमंत्र्यांनी जाणे आवश्यक होते. पण, त्यावेळेस पर्यटनमंत्री असलेले आदु बाळ का गेले? असा सवालही उपस्थित केला.

आव्हाड सोडून इतरांना आमंत्रण देऊ -

राम मंदिराचे श्रेय हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे, हे खासदार राजन विचारे आणि त्यांच्या नेत्यांनी मान्य करावे आम्ही ठाण्यातील सर्व आमदार, खासदारांना त्यांच्या घरी जाऊन महाआरतीचे निमंत्रण देऊ असेही ते म्हणाले. मात्र जितेंद्र आव्हाड यांना निमंत्रण दिले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान बोलताना नरेश म्हस्के(Naresh Mhaske) म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी भरत गोगावले हेच शिवसेना पक्ष प्रतोद असल्याचे स्पष्ट केले आहे. तर, ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करणे गरजेचे आहे. अध्यक्षांना कुणी भीती दाखविली का आणि त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? यामुळेच त्यांनी हा निकाल दिला का? असे अनेक प्रश्न आम्हाला पडल्याचे म्हस्के म्हणाले.

त्यामुळेच नियमानुसार आम्ही आधी उच्च न्यायालयात जाऊन उबाठा गटातील 14 आमदारांना अपात्र करण्याची मागणी केल्याचेही म्हस्के यांनी सांगितले. आपल्या बाजूने निकाल लागला तर, चांगले बोलायचे आणि विरोधात निकाल लागला तर टीका करायची, ही त्यांची(ठाकरे गट) सवय असल्याचेही म्हस्के म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT