CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची 2018 मध्ये शिवसेनेच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांनी निवड केली होती. त्याचे व्हिडीओही दाखवण्यात आले. तसेच निवड झाल्यानंतर व्यासपीठावर गेलेल्या एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या पाया पडल्याचेही व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले. आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार अपात्रतेवरून पत्रकार परिषद झाली. यावेळी ठाकरे गटाने पुरावे, व्हिडीओ पत्रकारपरिषदेत सादर केले.
यावेळी एकनाथ शिंदे आणि विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर तोफ डागली. यावेळी अनिल परबांनी निवडणूक आयोगाला घटनादुरुस्तीत बदलाची माहिती दिल्याची पोहोच दाखवली. तसेच पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे नोंद असल्याची काही कागदपत्रेही अनिल परब यांनी यावेळी दाखवली.
अॅड. बाळकृष्ण जोशी यांनी 2018 मधील निवडणूक प्रक्रिया पार पाडली. ते निवडणूक अधिकारी होते. 15 डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. 5 ते 10 जानेवारीदरम्यान अर्ज मागवण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेनानेते 13 आणि उपनेतेपदाच्या 21 जागा होत्या. पक्षप्रमुखपदासाठी केवळ उद्धव ठाकरे यांचा अर्ज होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जोशी यांच्याकडून त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली असल्याची यावेळी सांगण्यात आले. तीन महत्त्वाचे ठराव 23 जानेवारी 2018 च्या बैठकीत करण्यात आले होते. त्याचा व्हिडीओही दाखवण्यात आला. 2013 मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा या पदासाठी एकमेव अर्ज आला होता. त्यांची निवड त्यावेळी करण्यात आली होती. राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी नऊ अर्ज आले होते. त्यांची निवडही जाहीर करण्यात आली होती. याबाबतचा व्हिडीओ यावेळी दाखवण्यात आला.
नार्वेकरांविरोधात अविश्वास
अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट उच्च न्यायालयात गेले आहेत. राज्यपालांनी अधिवेशन बोलावावं. अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा, मी पाठिंबा आज जाहीर करतो. शिवसेनाप्रमुख होण्याची तुमची लायकी नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षाच आहेत. पण आज जनतेच्या न्यायालयात आलो आहोत. गेल्या आठवड्यात लबाडानं... लवादानं निकाल दिला. नार्वेकर व मिंधे गटाने विनासुरक्षा येऊन सांगावे की शिवसेना कुणाची. मीही विनासंरक्षण येतो. मग जनतेने ठरवावे कुणाला पुरावे, गाडावे? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
तर आमदार अपात्र...
निवडून आलेल्या सदस्यांच्या गटाला विधिमंडळ पक्ष म्हटले जाते. तो अस्थायी पक्ष असतो. राजकीय पक्षाचा आवाज हे त्या पक्षाचा लीडर असतो. संविधानात राजकीय पक्षाचा उल्लेख दहाव्या परिशिष्टात करण्यात आला आहे. एखादा आमदार निवडणूक जिंकतो, त्यावेळी त्याचे काम असते पक्षाच्या निर्णयाचे पालन करावे, असे परिशिष्टात नमूद केले आहे. पालन केले नाही तर तो अपात्र ठरू शकतो, असे अॅड. रोहित शर्मा यांनी यावेळी सांगितले.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.