Uddhav Thackeray Press Conference : 'हा सूर्य हा जयद्रथ' आता तरी... ; महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान!

Uddhav Thackeray latest news : एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकरांना दिलं खुलं आव्हान, म्हणाले...
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray Press Conference At Worli : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर मंगळवारी ठाकरे गटाकडून वरळीत महापत्रकार परिषद घेत, या निकालाची जाहीरपणे चिरफाड केली. या प्रसंगी कायदेतज्ज्ञ असीम सरोदे, ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि संजय राऊतांनीही भाषणातून एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली, तर या प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी 'हा सूर्य हा जयद्रथ' असं म्हणत मोठं विधान केलं.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले, ' मागील आठवड्यात लबाडाने जो निकाल दिला, लबाडाने नाही लवादाने जो निकाल दिला. त्याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत. सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहेच. ती एक शेवटची आशा असं मानलं तरी, सर्वोच्च न्यायालयात या देशातील लोकशाहीचा मूलभूत घटक तो जनता त्या न्यायालयात आम्ही आलो आहोत.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Shiv Sena MLA Disqualification Case : झोपल्याचं सोंग घेतो त्याला कसं उठवणार? नार्वेकरांचा ठाकरेंना टोला

तसेच, 'कारण, देशात मतदार हा सरकार ठरवत असतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या, की कदाचित आपला एकमेव किंवा फार कमी देश असे आहेत, जनतेने संविधान जनतेच्या चरणी अर्पण केलं आहे. म्हणजेच काय संविधान कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

याचबरोबर 'मला कल्पना आहे ही काही जाहीर सभा नाही, बरचसं जे काही सांगायचं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. हा सूर्य हा जयद्रथ आता तरी न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर संजय राऊत आपण जे बोललात, पुरावा की गाडावा. माझं तर आव्हान आहे नार्वेकरांनी शिंदेंनी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभ राहावं. मी एकही पोलिस सोबत घेणार नाही, तसंच शिंदेंनी आणि नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांना(Rahul Narwekar) सांगावं शिवसेना कुणाची? मग जनतेने ठरवावं, कुणाला पुरावा, गाडावा की कुणाला तुडावावा. माझी तयारी आहे, माझ्यात हिंमत आहे,' असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी या वेळी दिलं.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Press Conference: ठाकरे गटाचाही 'लाव रे तो व्हिडिओ; पुरावेच पुरावे देत नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड

याशिवाय अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ते उच्च न्यायालयात गेले आहेत. राज्यपालांनी अधिवेशन बोलावावं. अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा, मी पाठिंबा आज जाहीर करतो. शिवसेना प्रमुख होण्याची तुमची लायकी नाही. तसेच, जल्लादाचे काम लवादाला दिले होते. फाशी द्यायचे सोडून तो दोषीचा जन्मदाखला नसल्याचे कारण सांगतो, अशी टीकाही या वेळी उद्धव ठाकरेंनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com