Shivsena Thane News : शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी ठाणे दौरा केला. या दरम्यान त्यांनी ठाण्यातील शाखेचे उद्घाटन केले आणि अन्य शाखांना भेटही दिली. यानंतर आयोजित सभेत बोलताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिंदे गट, भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली, तर त्यांच्या या टीकेला शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नरेश म्हस्के म्हणाले, 'काल आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांचा ठाण्यामध्ये कॉमेडी शो होता. यापुढे त्यांना नकला करणे हा एकमेव उद्योग राहणार आहे. दुसरं काहीच काम त्यांच्याकडे नसणार. तमाशामध्ये एक पात्र असतं आता त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे. त्याला नाचा म्हणतात आणखी काही वेगवेगळे म्हणतात. आता त्यांना मी नाचा म्हणत नाही, परंतु त्या पात्राचं काम असतं लोकांना हसवणं आणि ते काम काल त्यांनी ठाण्यामध्ये येऊन केलं.'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याचबरोबर 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि श्रीकांत शिंदे यांची नक्कल करण्याइतपत आपण मोठे नाही आहात. आपण पुरुषांसारखा आवाज काढा आणि पुरुषांसारखे बोला. श्रीकांत शिंदे यांनी तुम्हाला कल्याणसाठी आव्हान दिले आहे, तिकडे त्यांच्या विरोधात उभे राहा. स्वतःला लढण्यासाठी स्वतःचा घरचा मतदारसंघ सोडून दोन-तीन जणांचे बळी देऊन वरळीसारखा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला. आता वरळी सोडून तुम्ही शिवडीमध्ये उभे राहता म्हणजे आता अजय चौधरींचा बळी देणार,' असंही म्हस्के म्हणाले.
याशिवाय 'कुणाचा राजीनामा मागत आहात हे सर्व बालिश चाळे सोडून द्या. पक्ष जो आहे तो वाचतोय का बघा, पक्षाची वाहतात झालेली आहे ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. ठाण्याचा भाग धर्मवीर आनंद दिघे यांचा आहे तुमचा नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या धर्मवीर आनंद दिघेंचा भाग आहे. त्यामुळे आधी तुम्ही जिथे राहताय तो भाग तुमचा आहे का बघा, तिथे नगरसेवक तुमच्या पक्षाचा आहे का बघा. अगोदर आपले घर सांभाळा नंतर दुसऱ्याच्या भागावर अधिकार गाजवा,' अशी टीकाही नरेश म्हस्केंनी केली.
या वेळी नरेश म्हस्के(Naresh Mhaske) यांनी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंवरही निशाणा साधला. 'राजन विचारे यांचे विचार हास्यास्पद विषय आहे. आनंद दिघे यांचे विचार त्यांची प्रतिमा टिकून ठेवण्यासाठी ती अशीच पुढे चालू राहण्याकरिता कोणी काय केलं, कोण काय करतंय, हे थोड्याच दिवसांत तुम्हाला कळेल. ठाणे शहराचा जो विकास झाला आहे तो लोकांसमोर आहे. पूर्वीचे ठाणे आणि आत्ताचे ठाणे हे लोकांसमोर आहे. मुंबईची अगोदर काय परिस्थिती होती आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईत काय बदल होत आहेत, याबाबत लोकांनी प्रशंसा केली आहे.'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.