Aditya Thackeray News : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गट वाढवतोय ताकद; उद्धव ठाकरेंपाठोपाठ आदित्य ठाकरेंचाही दौरा!

Shivsena UBT News : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा खूपच महत्वाचा असल्याचे बोलले जात आहे.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama

Thane Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने आता चांगलेच लक्ष घातल्याचे दिसत आहे. येथील जिजामाता नगर येथील शाखेच्या उद्घाटनासाठी आमदार आदित्य ठाकरे हे रविवारी ठाण्यात येत आहेत. याचदरम्यान ते ठाण्यातील विविध शाखांनाही भेटी देणार असून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था पाहता मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र शिवसेना फुटीनंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांना आरोप प्रत्यारोप अद्यापही सुरूच आहेत. मध्यंतरी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या कल्याण दौऱ्यात त्यांनी ठिकठिकाणीच्या शाखांना भेटी देत शिवसैनिकांशी संवाद साधला होता, त्यावेळी झालेली गर्दी पाहून अजूनही शिवसैनिक ठाकरे गटाच्याच पाठीशी असल्याचे दिसून आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Aditya Thackeray
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडानी धनंजय मुंडेंची लायकीच काढली; म्हणाले, 'ज्याच्या रक्तात गद्दारी...'

तर रविवारी आमदार आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) हे ठाणे दौऱ्यावर येणार आहेत, याच दरम्यान तेही ठाण्यातील शाखांना भेटी देणार आहेत. तसेच शिवसैनिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान जिजामाता नगर येथे नव्याने उभारलेल्या शाखेचे उद्घाटन आदित्य ठाकरे हे करणार आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा खूपच महत्वाचा असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना फुटीनंतर ठाण्यात शाखांचा वाद उफाळून आला होता. त्यामध्ये शाखा ताब्यात घेण्यापासून कंटनेर शाखा उभारण्यापर्यंत वाद सुरू असताना, आता ठाकरे गटाची नवीन शाखा उभारण्यात आली आहे. तर, कल्याण लोकसभेत एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटाचे खासदार असतानाही उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. तर ठाणे लोकसभेत उबाठा गटाचे खासदार असल्याने आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Aditya Thackeray
Kalyan Dombivli News : रिपाइंचे नेते ऑन फिल्ड, ओस पडलेले कार्यालय अखेर गजबजले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com