Maharashtra minister Narhari Zirwal faces controversy after a viral video surfaced, triggering political reactions across the state. Sarkarnama
मुंबई

Narhari Zirwal video : नरहरी झिरवाळांना राष्ट्रवादीतून मिळाला पहिला पाठिंबा : अशोक खरात प्रकरण अंगलट येतंय म्हणून डाव टाकल्याचा दावा

Amol Mitkari On Narhari Zirwal video controversy : 'भोंदू बाबांबरोबर काही लोकांचं जे धार्मिक कनेक्शन उघड होतं ते समोर येत आहे, असे लक्षात येताच सहा सात महिन्यापूर्वी काढून ठेवलेला श्री झिरवळ साहेबांचा व्हिडिओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला? राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी ही इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती म्हणजे झिरवाळ साहेब.'

Jagdish Patil

Mumbai News, 26 Mar : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप आला आहे. तो म्हणजे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये शासकीय निवास्थानात मंत्री झिरवळ ट्रान्सजेंडरसोबत नको त्या अवस्थेत या दिसत आहेत. या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आधी भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर अडचणीत आल्या आहेत.

अशातच आता राष्ट्रवादीच्याच नेत्याचं आणखी एक प्रकरण बाहेर आल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे. शिवाय काही लोकांनी खरात प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी बाहेर काढल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे.

मिटकरी यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'भोंदू बाबांबरोबर काही लोकांचं जे धार्मिक कनेक्शन उघड होतं ते समोर येत आहे, असे लक्षात येताच सहा सात महिन्यापूर्वी काढून ठेवलेला श्री झिरवळ साहेबांचा व्हिडिओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला? राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी ही इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती म्हणजे झिरवाळ साहेब.

त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये ACB चा ट्रॅप लावणे व नंतर आता हा व्हिडिओ सात महिन्यापूर्वी काढून मिडियाला सोपवणे, एका सरळ माणसाला बदनाम करायचं नंतर मीडिया ट्रायल हे झारीतील शुक्राचार्य कोण?' असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

शिवाय यावेळी त्यांनी अशोक खरात प्रकरण अंगलट येतंय म्हणून स्वतःवरील लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार व हे वंगाळ राजकारण लक्षात येतय, सोमवती अमावस्या ते अघोरी पुजा ह्या मागे २ सप्टेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६', असा गंभीर दावा देखील मिटकरी यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे आणि झिरवाळ यांना नेमकं कोण अडचणीत आणत आहे याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT