Vidhan Bhavan Sarkarnama
मुंबई

Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून या तीन नावांची चर्चा; एकावर होणार शिक्कामोर्तब

Congress Candidate : भाजपने सहावा उमेदवार दिला तरच निवडणूक लागू शकते; अन्यथा विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 21 June : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार असून राजकीय पक्ष उमेदवार निश्चितीच्या कामाला लागले आहेत. काँग्रेसकडून नसीम खान, माणिकराव ठाकरे, मुझ्झफर हुसेन यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. काँग्रेस हायकमांड लवकरच या तीनपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे संख्याबळ लक्षात घेता या तिघांपैकी कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर राज्यात विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) 11 जागांसाठी निवडणूक (Election) जाहीर झाली आहे. येत्या 12 जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 2 जुलै आहे. ही मतदान प्रक्रिया 16 जुलैच्या आधी पूर्ण करायची आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांकडून हालचाली सुरू आहेत.

विधानसभेतील सध्याचे संख्याबळ लक्षात घेता भाजपचे पाच आमदार सहज निवडून येऊ शकतात. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे प्रत्येकी दोन आमदार निवडून येतील. काँग्रेसचा (Congress) एक आमदार निवडून येऊ शकतो.

शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षाच्या मदतीतून एक उमेदवार निवडून येऊ शकतो. भाजपने सहावा उमेदवार दिला तरच निवडणूक लागू शकते; अन्यथा विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते.

काँग्रेस पक्षाकडून एक आमदार निवडून येऊ शकतो. त्यानुसार काँग्रेस पक्षाकडून उमेदवाराचा चाचपणी सुरू आहे. त्यातही काँग्रेसकडून जातीय समीकरणांचा विचार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष तथा तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, मुझ्झफर हुसेन यांच्या नावाची चर्चा विधान परिषदेच्या उमेदवारासाठी सुरू आहे. काँग्रेस हायकमांड कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

या आमदारांचा कार्यकाळ संपला

मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप), निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस), रामराव पाटील (भाजप), प्रज्ञा सातव (काँग्रेस), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT