Solapur, 21 June : सोलापुरातील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या कार्यालयात गाडी घुसवत धुडगूस घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे शहर सरचिटणीस सोहेल शेख यांच्यासह तिघांच्या विरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या (Congress) अल्पसंख्याक सेलचे शहर सरचिटणीस सोहेल शेख (Sohail Shaikh) आणि त्यांचे सहकारी सादिक शेख आणि मोहसीन शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे (Manish Kalje) यांचे सोलापुरातील सात रस्ता परिसरात कार्यालय आहे. या कार्यालयाच्या गेटवर गाडी घुसवतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, घटनेनंतर काही वेळातच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते.
काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे शहर सरचिटणीस सोहेल शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा धुडगूस घातल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी केला होता. दरम्यान पूर्व वैमनस्यातून हा धुडगूस घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या कार्यालयात गाडी घुसवून धुडगूस घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे शहर सरचिटणीस सोहेल शेख यांच्याविरोधात सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 353, 354, 352, 34 प्रमाणे वरील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी मोहसीन शेख यांच्यावर अतिक्रमण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे असा ठपका ठेवत भारतीय दंड संहिता कलम 447, 341, 427, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
या सोबतच संबंधीत व्यक्तींनी पोलिसांसोबत झटापटी करत शासकीय कामात अडथळा आणणे, महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे, या प्रकरणी सोहेल शेख, सादिक शेख आणि मोहसीन शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.