IAS Pooja Khedkar controversy Sarkarnama
मुंबई

IAS Pooja Khedkar controversy : बेपत्ता वादग्रस्त IAS पूजा खेडकर कुटुंबाप्रकरणी मोठी कारवाई; नवी मुंबई अपहरणात दिलीप खेडकरच्या चालकाला अटक

Navi Mumbai Kidnapping Case IAS Pooja Khedkar Father Driver Arrested in Dhule : नवी मुंबई अपहरण प्रकरणात पसार असलेले दिलीप खेडकर यांच्या वाहन चालकाला धुळे इथून पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली.

Pradeep Pendhare

Navi Mumbai crime news : वादग्रस्त IAS पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर यांनी नवी मुंबईतून ट्रक चालक हेल्परच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे. दिलीप खेडकर यांच्या चालकाला धुळे इथून अटक केली आहे.

नवी मुंबई पोलिसांनी चालक प्रफुल्ल साळुंखे याला अटक केल्यानंतर आज शनिवारी सकाळी त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

प्रफुल्ल खेडकर याच्याकडे नवी मुंबई पोलिसांनी (Police) केलेल्या प्राथमिक चौकशीत गंभीर माहिती समोर आली आहे. खेडकर कुटुंबाच्या सांगण्यावरून चालक प्रफुल्ल साळुंखे यानेच ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमारच्या अपहरणात मदत केली. प्रल्हाद कुमार (वय 22) हा ट्रक हेल्पर असून, त्याला जबरदस्तीने पकडून पुण्यातील खेडकर कुटुंबाच्या घरी डांबून ठेवले होते. पोलिसांनी छापा टाकून प्रल्हाद कुमारला सुरक्षित सोडवले.

सध्या या प्रकरणात फक्त चालकाची अटक झाली असून, दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर आणि सुरक्षा रक्षक पसार आहेत. त्यांचा शोधासाठी नवी मुंबईसह पुण्यातील (Pune) विविध ठिकाणी कारवाई सुरू आहे. या पसार संशयितांच्या शोधासाठी नवी मुंबई पोलिसांनी तीन पथके तैनात केली आहेत.

प्रकरण नेमकं काय?

नवी मुंबईतील मुलुंड-ऐरोली मार्गावर शनिवारी (ता. 13) सायंकाळी सुमारे सव्वा सातच्या सुमारास सिमेंट मिक्सर ट्रक आणि लँड क्रूझर वाहनाचा (MH 12-RP 5000) अपघात झाला. अपघातानंतर वाहनातून उतरलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने गाडीत बसवून नेले, असा आरोप आहे.

अपघातातील वाहन

ट्रक चालकाने ही घटना तात्काळ मालक विलास ढेंगरे यांना कळवली आणि रबाळे पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित लँड क्रूझरचा शोध घेत MH 12-RP 5000 क्रमांकाची गाडी पुण्यातील बाणेर परिसरात एका बंगल्यासमोर उभी असल्याचे निदर्शनास आली. पोलिसांनी चौकशीत हा बंगला वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले.

खेडकरांच्या बंगल्याची झडती

या प्रकारांच्या चौकशीसाठी पोलीस खेडकर कुटुंबियांच्या बंगल्यावर गेले असता दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर पसार झाल्याचे समोर आले. पोलिसांकडून दोघांचाही शोध घेतला जात आहे. पसार होण्यापूर्वी दिलीप आणि मनोरमा खेडकर हे त्यांचे फोन पुण्यातील बंगल्यात ठेऊन बेपत्ता झाले आहेत.

पूजाचा जुना मोबाईल जप्त

रबाळे आणि पुण्यातील चतुश्रुंगी पोलिसांनी दोघांच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेतले, असता त्यांचे अखेरचं लोकेशन त्यांच्या बंगल्यातच आढळले. पोलिसांनी आतमध्ये जाऊन तपास केला असता दोघांच्या मोबाईलचे लोकेशन आढळणे बंद झाले. पोलिसांनी घरातून पूजा खेडकरचा एक जुना मोबाईल ताब्यात घेतला आहे.

मनोरमा अशा पसार झाल्या...

मात्र, दिलीप आणि मनोरमा खेडकर यांचे मोबाईल मात्र सापडलेले नाहीत. दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्या रबाळे इथल्या अपघातातील 5000 क्रमांकाची लॅन्ड क्रुझर गाडी वगळता सर्व गाड्या बंगल्यातच आहेत. तर मनोरमा खेडकर या कॅबमधून पळाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT