Navneet Kaur Rana
Navneet Kaur Rana  Sarkarnama
मुंबई

Mahavikas aghadi : नवनीत राणांचा जावईशोध; महामोर्चाला तीन हजारच लोकं, राणांनी महाविकास आघाडीला डिवचलं

सरकारनामा ब्यूरो

Mahavikas aghadi maha morcha : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh koshyari) आणि भाजपच्या (BJP) काही नेत्यांनी महापुरूषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि.१७) महाविकास आघाडी आणि घटक पक्षांकडून मुंबईत (Mumbai) महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महाविकास आघाडीतील नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह तीनही पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते.

या मोर्चाला मोठी गर्दी जमवण्यात आली होती. मात्र मोर्चासाठी नेमकं किती लोकं आले होते? याची आकडेवारी किती होती? याबाबत वेगवेगळे मतं सांगण्यात येत आहेत. आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) आणि पोलिसांनी सांगितलेला आकडा हा वेगवेगळा आहे. त्यामुळे आघाडीच्या महामोर्चासाठी झालेल्या गर्दीचा नेमका आकडा किती? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला फक्त तीन हजारच लोक उपस्थित होते, असं खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं. तर महाविकास आघाडीच्या या महामोर्चाला ६५ हजार लोकं उपस्थित होते, असं पोलिसांनी सांगितलंय. मात्र पोलिसांनी सांगितलेला महामोर्चाचा आकडा हा राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी यांनी खोडून काढत सरकारवर टीका केली.

मिटकरी म्हणाले, ''महाविकास आघाडीच्या महामोर्चामध्ये तब्बल २ लाखांपेक्षा जास्त लोकं प्रत्यक्ष सहभागी होते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आदेशावरून पोलिसांनी ६५ हजार एवढी आकडेवारी काढलेली दिसतेय, माणसांनी उद्विग्न व्हावं पण इतकंही नाही'', असा टोला अमोल मिटकरी यांनी ट्विटमधून लगावला. तर मिटकरी यांच्या मतानुसार महाविकास आघाडीच्या महामोर्चाला दोन लाखांपेक्षा जास्त लोकं उपस्थित होते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चाचा आकडा सांगताना मोर्चाला फक्त तीन हजारच लोक उपस्थित होते, असं म्हटलंय. तर हा मोर्चा नौटंकी होता, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. राणा म्हणाल्या, ''ठाकरे सरकार गुंडशाही सरकार होतं.

एवढंच नाही तर हनुमान चालीसा वाचणे म्हणजे देशद्रोह ही आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी नोंद ठाकरे सरकारच्या काळात झाली. पण सध्या शिंदे-फडणवीस सरकार हे संविधानावर चालणारं सरकार आहे. ठाकरे यांच्या नाटक कंपनीकडून संत आणि देवांना घेऊन जे नाटक सुरू आहे ते ठाकरेंनी बंद केले पाहिजे'', अशी टीका राणा यांनी केली.

दरम्यान, महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) मोर्चा अयशस्वी झाला असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचा नॅनो मोर्चा असा उल्लेख करत टीका केली. मात्र या मोर्चामध्ये नेमकं किती लोकांची गर्दी होती? याबाबत वेगवेगळे दावे करण्यात आल्याने मोर्चामध्ये नेमकं आकडा किती होता? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT