Nawab Malik Sarkarnama
मुंबई

Nawab Malik: भाजपच्या मोहित कंबोज यांची अचानक माघार, नवाब मलिकांना 2021 च्या गाजलेल्या खटल्यात मोठा दिलासा

Mohit Kamboj Vs Nawab Malik : एनसीबीने ऑक्टोबर 2021 मध्ये एका क्रूझ जहाजावर छापा टाकला होता, त्यात आर्यन खानसह अनेक हायप्रोफाईल लोकांना अटक केल्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकारण तापलं होतं. याचदरम्यान, भाजप पदाधिकारी मोहित कंबोज यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये न्यायालयात नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

Deepak Kulkarni

Mumbai News : एनसीबीने ऑक्टोबर 2021 मध्ये एका क्रूझ जहाजावर छापा टाकला राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकारण तापलं होतं.याचदरम्यान, भाजप पदाधिकारी मोहित कंबोज यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये न्यायालयात तक्रार दाखल करत नवाब मलिक यांनी त्यांची आणि त्यांच्या मेहुण्यांची बदनामी केल्याचा आरोप केला होता. पण आता न्यायालयानं या प्रकरणी नवाब मलिक (Nawab Malik) यांची निर्दोष मुक्तता केली आहे

भाजप नेते मोहित कंबोज यांनी 30 जून रोजी नवाब मलिकांविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयानं सोमवारी (ता.30) महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्धचा मानहानीचा खटला बंद केला.

आरोपी आयपीसी कलम 500 (मानहानी)अंतर्गत गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे.तसेच याप्रकरणासंबंधीची कार्यवाही बंद करण्यात येत असल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे.याबाबत पीटीआयने या वृत्तसंस्थेनं दिले आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेक व्यक्तींना अटक करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते.

याचदरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांची आणि त्यांच्या मेहुण्या ऋषभ सचदेव यांची 'हेतुपुरस्सर आणि जाणीवपूर्वक बदनामी केल्याची तक्रार दाखल केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खानची अटक बनावट असल्याचा धक्कादायक आरोपही केला होता.

मोहित कंबोज यांनी खटला मागे घेण्याबाबत अर्ज करताना या न्यायालयाला हा खटला दैनंदिन आधारावर चालवायचा असल्यानं आरोपीविरुद्ध दाखल केलेला खटला मागे घेण्यास आपण इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. याचवेळी त्यांनी मी दररोज न्यायालयात उपस्थित राहू शकणार नसल्याचंही अर्जात स्पष्ट केलं होतं.

याचदरम्यान,त्यांनी आपण हा खटला स्वेच्छेने मागे घेण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भात माझ्यावर कोणताही अनावश्यक दबाव किंवा सक्ती करण्यात आलेली नाही,असंही कंबोज यांनी अर्जात सांगितलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT