Nawab Malik Bail News : Kapil Sibbal
Nawab Malik Bail News : Kapil Sibbal Sarkarnama
मुंबई

Nawab Malik Bail : नवाब मलिकांसाठी आता कपिल सिब्बल मैदानात; जामिनासाठी करणार युक्तिवाद !

सरकारनामा ब्यूरो

Kapil Sibal Argument bail for Nawab Malik : सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे आमदार व माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे. १ मे रोजी मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यात विशेष बाब म्हणजे आता मलिक यांच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल करणार आहेत. यामुळे आता मलिकांना जामीनाबाबत दिलासा मिळतो का, याकडे लक्ष लागले आहे.

मलिक यांनी ईडीने केलेल्या अटकेविरोधात जामिनासाठी अर्ज केला आहे. तसेच मलिक हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे, त्यांच्या वकीलांकडून सांगण्यात येत आहे. मलिक यांची एक किडनी फेल झाली आहे, यासाठी त्यांना जामीन मिळावा अशी सिब्बल यांची मागणी आहे. यामुळे त्यांच्या जामीनावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती मलिकांच्या वतीने वकिलांनी न्यायालयात केली होती.

मलिक हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे कोर्टाने मान्य केले. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मलिकांच्या जामिन अर्जावर १ मे रोजी सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे मलिकांना काहीसा दिलासा मिळाला असून, १ मे रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार आहे. यावेळी नवाब मलिकांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT