Nawab Malik Sarkarnama
मुंबई

Nawab Malik Bail : नवाब मलिक 'असे' सुटले, पण 'तसे' अडकले; काय आहे कारण ?

Malik On Wait For Release From Jail : तुरुंगातून बाहेर येण्यासाठी मलिकांना पाहावी लागणार काही दिवस वाट

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना सुमारे दीड वर्षानंतर अखेर जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाने प्रकृतीचा विचार करून दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करत मलिकांना मोठा दिलासा दिला आहे. मलिकांना अंतरिम जामीन मिळाला असला तरी त्यांना तुरुंगातून बाहेर येण्यासाठी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. (Latest Political News)

नवाब मलिकांना शुक्रवारी जमीन मंजूर झाला असला तरी सुटका होण्यासाठी त्यांना आता काही दिवसांचा अवधी लागणार आहे. आदेशानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत विशेष पीएमएलए कोर्टाला सादर करावी लागणार आहे. दरम्यान सत्र न्यायालयाला शनिवारी, रविवारी सुट्टी असल्याने मलिकांच्या सुटकेबाबत सोमवारीच प्रक्रिया होऊ शकते. यानंतर पीएमएलए कोर्टाने सुटकेचे आदेश दिल्यानंतरच मालिकांची तुरुंगातून सुटका होणार आहे. सध्या मलिक कुर्ल्यातील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार घेत आहेत.

नवाब मलिक फेब्रुवारी 2022 पासून मनी लाँडरिंग प्रकरणी तुरुंगात आहेत. कुर्ला या ठिकाणी गोवावाला कंपाऊंडच्या जागेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप मलिकांवर आहे. गेल्या काही दिवसांपासून मलिक आजाराने त्रस्त आहेत. प्रकृतीचे कारण देत वैद्यकीय जामीन मिळण्यासाठी मलिकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर झालेल्या सुनावणीत वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही. यानंतर कोर्टाने मलिकांना जामीन मंजूर केला.

दरम्यान, प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यासाठी त्यांनी वारंवार कोर्टाला विनंती केली होती. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे 'ईडी'ने सांगितले. मलिकांना जामीन मिळताच राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या जामीनाचा आणि राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीचा संबंध जोडला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर मलिक काय भूमिका घेणार याकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT