Nawab Malik moves Supreme Court for bail Sarkarnama
मुंबई

Nawab Malik Bail News : जामिनासाठी नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव; सुनावणी कधी?

Nawab Malik moves Supreme Court for bail : चार्टशीटमध्ये ईडीने 17 जणांना साक्षीदार बनवले..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन अर्ज उच्च नायालयाने नामंजूर केला होता. त्यामुळे मलिकांना दिलासा मिळू शकलेला नाही. मात्र आता मलिकांकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज करण्यात आला आहे. (Nawab Malik moves Supreme Court for bail)

आजारपणाच्या कारणास्तव जामीन मिळावा म्हणून नवाब मलिकांकडून सर्वोच्च न्यायावयात अर्ज केला आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांनी त्यांचा एक दिवसापूर्वी (ता.१३) जामीन अर्ज फेटाळला होता. यांनतर नवाब मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. दरम्यान २३ फेब्रुवारी 2022 पासून नवाब मलिक अटकेत आहेत.

काय आहे प्रकरण ?

ईडीने 23 फेब्रुवारीला नवाब मलिकांना अटक केली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. मलिकांनी कुर्ल्यातील मालमत्तेच्या प्रकरणी दाऊद इब्राहिम आणि 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी असलेल्या सरदार खानसोबत बैठका केल्याचा दावा एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने (ED) विशेष न्यायालयासमोर सादर केलेल्या आरोपपत्रात केला आहे.

विशेष न्यायालयाने या आरोपपत्राची दखल घेत मनी लाँड्रिंग प्रकरणात पुढील कारवाई करण्यास मान्यता दिली होती. 21 एप्रिल रोजी ईडीने नवाब मलिक यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. आपल्या चार्टशीटमध्ये ईडीने 17 जणांना साक्षीदार बनवले आहे. त्यात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर यांच्यासह सरदार शाहवली खान यांच्या जबाबांचाही समावेश आहे.

दोषारोपपत्रात काय म्हंटलंय?

​​​​​​​​​​​​​​नवाब मलिकांचे डि-गँगशी संबंध होते. नवाब मलिकांनी मनी लाँड्रिंग केल्याचे ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात सांगण्यात आले. दाऊद गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली, असे या दोषारोपपत्रात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT