Satara NCP News : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी शरद पवार यांनी जनतेसाठी पुन्हा ८३ व्या वर्षी पायाला भिंगरी लावून कामाला सुरुवात केली आहे. पवारसाहेब नावाचे एक वादळ पुन्हा महाराष्ट्रात निर्माण होत आहे. या वादळात हे तीन चाकी सरकार कोलमडल्याशिवाय राहणार नाही. आपली लढाई ही हुकूमशाहीच्या विरोधात असून जे-जे आडवे येतील त्यांना बाजूला करुन नव्याने मोट बांधूया, असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस NCP भवनात गुरुवारी फ्रंटल सेलची आढावा बैठक आमदार शशिकांत शिंदेंच्या Shashikant Shinde अध्यक्षतेखाली झाली. यावेळी राष्ट्रवादीचे आयटी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील,सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, रमेश उबाळे, महिला प्रदेश उपाध्यक्षा कविता म्हेत्रे, प्रदेश सरचिटणीस समिंद्रा जाधव, संजना जगदाळे,आदी उपस्थित होते.
आमदार शिंदे यांनी उपस्थित फ्रंटल सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. शशिकांत शिंदे म्हणाले, सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित राखण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागूया. सातारच्या राजधानीत छत्रपतीं शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून काम करुया. आपल्या पाठीमागे पक्षाचे प्रमुख पवारसाहेबांची ताकद आहे.
जो यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आहे, तोच विचार पवारसाहेबांचा आहे. विचारांचा वारसा जपतो तोच राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांला आता काम करण्याची संधी आहे. आपली लढाई ही हुकूमशाहीच्या विरोधात आहे. या लढाई कोणी आडवे आले तर त्याला बाजूला सारुन आपण आपली विचारधारात पुढे नेवूया.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.