Nawab Malik and Sameer Wankhede Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

Sameer Wankhede : वानखेडे हिंदू की मुस्लीम ? ; मलिकांच्या आरोपावर समितीचं स्पष्टीकरण

sameer wankhede latest news : वानखेडे यांनी धर्मांतराच्या माध्यमातून दुहेरी लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबईतील क्रूज ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानं यांचे नाव समोर आल्यानंतर त्याला अटक करणारे तत्कालीन एनसीबीचे (ncb)विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांचीच सगळीकडं चर्चा होती.

या प्रकरणात तपासापेक्षा वानखेडे हे कोणत्या जातीचे आहे, यावरुन संभ्रम आणि आरोप- प्रत्यारोप करण्यात आले. हे प्रकरण जातपडताळणी समितीसमोर गेले. या समितीनं याबाबत निकाल दिला आहे. (sameer wankhede latest news)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आघाडी सरकारमधले माजी मंत्री असलेले नवाब मलिक यांनी एका पाठोपाठ समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या.

समीर वानखेडे यांनी धर्मांतराच्या माध्यमातून दुहेरी लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता.

या प्रकरणाचा तपास राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी समिती करत होती. या समितीचा निकाल नुकताच लागला आहे. समीर वानखेडेंच्या बाजूने हा निकाल लागला आहे.

समीर वानखेडे जन्माने मुस्लीम नाहीत. वानखेडेंच्या वडिलांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्माचा स्विकार केल्याचं सिद्ध होत नाही, असं समितीने आपल्या निकालात म्हटलं आहे.

समीर वानखेडे हिंदू महार ३७ अनुसुचित जातीचे सिद्ध होत असल्याचं समितीने म्हटलं आहे. तसंच समीर वानखेडेंविरोधात केलेली तक्रार सिद्ध होत नसल्याने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ही तक्रार फेटाळली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता वानखेडेंना दिलासा मिळाला आहे.

नवाब मलिक यांनी प्रकरणाशी संबधित कथित माहिती ट्विटरच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली होती. त्यात समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा आणि फोटो यांचा समावेश होता. नवाब मलिकांनी पोस्ट केलेल्या या निकाह नाम्यामध्ये समीर वानखेडे यांचं पूर्ण नाव 'समीर दाऊद वानखेडे' असं लिहिण्यात आलेलं आहे.

मलिक यांच्या आरोपांच्या नंतर समीर वानखेडे यांनी देखील प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलं होतं.अशा आरोपांच्या माध्यमातून मानसिक दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला होता.

"माझे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे 30 जून 2007 रोजी अबकारी विभागातून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू असून माझी आई मुस्लीम होती," असं समीर वानखेडे यांनी म्हटलं होतं. खऱ्या भारतीय परंपरेचं पालन करणाऱ्या एका बहुधार्मिक आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील मी सदस्य असून, मला त्याचा अभिमान आहे, असंही वानखेडे यांनी सांगितलं होत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT