Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Group News : सुनावणी सुरू असतानाच अजित पवार गटाचे महत्त्वपूर्ण पाऊल...कर्जतमध्ये ठरणार राजकीय रणनीती

NCP Criris : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारिणीचे समिती सदस्यही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी राजकीय रणनीतीवरही या कार्यकारिणीमध्ये चर्चा केली जाणार आहे, त्यामुळे या कार्यकारिणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. एकीकडे निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू असतानाच अजित पवार गटाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलेले आहे. (NCP Ajit Pawar faction Executive meeting on November 30)

अजित पवार यांनी शिवसेना-भारतीय जनता पक्षासोबत जाऊन राज्यात उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. अजितदादांसोबत आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार गटात 40 आमदार आणि दोन खासदारांचा समावेश आहे, पण पक्षाचे नाव आणि चिन्हावरून अजित पवार आणि शरद पवार गटात सर्वोच्च न्यायालय, तसेच निवडणूक आयोगामध्ये लढाई सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला विशेष महत्त्व आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कर्जतमध्ये येत्या 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी अजित पवार गटाचे एक शिबिर पार पडणार आहे. त्या शिबिरामध्ये 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात जोरदार लढाई सुरू आहे. निवडणूक आयोगातील सुनावणीपुढे राष्ट्रीय कार्यकारिणीमधील ठराव महत्त्वपूर्ण ठरतात. त्या पार्श्वभूमीवर या कार्यकारिणीमध्ये काही ठराव होतात का, हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, अजित पवार गटाने राष्ट्रीय कार्यकारिणीची कुठलीही बैठक घेतलेली नाही. अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यासाठी कोणत्याही बैठकीचे आयोजन करण्यात आलेले नव्हते, असे आरोप शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगापुढील सुनावणीदरम्यान करण्यात आले होते. त्यामुळे या कार्यकारिणीच्या माध्यमातून अजित पवार गटाकडून काही ठराव होतात किंवा महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात का, हे पाहावे लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगापुढे पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीला शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड उपस्थित आहेत. दुसरीकडे अजित पवार गटाकडून सुनील तटकरे, धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील हजर आहेत. आज शरद पवार गटाचा युक्तिवाद संपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT