NCP Ajit Pawar Group: अजित पवार गटाचा 'मास्टर प्लॅन'; लोकसभेसाठी बोलावली तातडीची बैठक

NCP Ajit Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आगामी निवडणुकीच्या दिशेने पावले टाकली.
NCP Ajit Pawar Group
NCP Ajit Pawar GroupSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दिशेने पावले टाकली आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी अजित पवार गटाने राज्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची कर्जत (जि.रायगड) येथे बैठक बोलावली आहे. ही बैठक 30 नोव्हेंबर आणि एक डिसेंबरला होत आहे. यात अजित पवार गटाच्या आगामी राजकीय वाटचालीवर विचारमंथन होणार आहे.

अजित पवार गटाने बोलावलेल्या या बैठकीत प्रमुख नेते असणार आहे. या बैठकीत लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांसह प्रमुख मुद्यांवर विचारमंथन होणार आहे. बैठकीला अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, कार्याध्यक्ष, आजी-माजी आमदार-खासदार यांच्यासह युवक आणि महिला विंगच्या अध्यक्षांना उपस्थित राहण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

NCP Ajit Pawar Group
Thackeray Group : ठाकरेंची पवारांवर कडी; रायगडमधून लोकसभेसाठी अनंत गीतेंच्या नावाची घोषणा

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून राज्यात रखडलेल्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती सुरू करण्यात आली आहे. या बैठकीत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी प्रमुख नेते पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहे.

अजित पवार गटाने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पदाधिकार्‍यांची ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. बैठकीत अजित पवार काय भूमिका मांडतील, याकडे आता पदाधिकार्‍यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकार्‍यांचा कल जाणून घ्यायचादेखील नेत्यांचा प्रयत्न असणार आहे.

अजित पवार गट महायुतीत असून, लोकसभेसाठी नऊ जागांवर संभाव्य दावा करत आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. यात अजित पवारांची ताकद सर्वाधिक असणार आहे. येथे तडजोड न करण्याची भूमिका पदाधिकार्‍यांकडून मांडली जाणार आहे.

जरांगे-भुजबळ वादाचे पडसाद

अजित पवार यांच्याबरोबर ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ हे आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौर्‍यावर असलेले मनोज जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या वाद रंगला आहे. एकमेकांवर टोकाची टीका सुरू आहे. एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरली जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या या बैठकीत या मुद्द्याचे वट असणार आहे. छगन भुजबळ पदाधिकार्‍यांशी यावर काय संवाद साधतात, याकडेदेखील लक्ष लागले आहे.

युवकांना अजित पवारांना जोडण्यावर भर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी केल्यानंतर अजित पवार यांनी त्यांची राजकीय घोडदौड वेगाने सुरू ठेवली आहे. अजित पवारांबरोबर असलेल्या नेत्यांनीदेखील अजित पवार गट विस्तारावर भर देत आहे. तसे नियोजनदेखील आहे.

अजित पवार यांची महाराष्ट्रात ताकद जास्त असून, त्यांना मानणारा युवा वर्ग सर्वाधिक आहे. युवकांमध्ये त्यांची क्रेझ आहे. या बैठकीतून अजित पवार गटाच्या विस्तारावर सर्वाधिक विचारमंथन होईल. युवकांना अजित पवार गटाबरोबर कसे जोडता येईल, यावर मार्गदर्शन या बैठकीतून होणार आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

NCP Ajit Pawar Group
Chandrakant Khaire News : लोकसभेची उमेदवारी मला मिळावी ही तर जनतेचीच इच्छा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com