Milk Price Issue : दूध संघांनी सरकारी आदेश धुडकावला; दूधदरात घसरण, संतप्त शेतकऱ्यांकडून आदेशाची होळी

Naga Milk Producer Farmers News : दूधदर पाडल्याने शेतकरी संतापले...दूध रस्त्यावर ओतून शासनाच्या आदेशाची गावोगाव केली होळी
milk producer farmer
milk producer farmerSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : दुधाला प्रतिलिटर 34 रुपये दर द्यावा, असा आदेश सरकारच्या दूधदर समितीने काढला. मात्र, हा शासकीय आदेश राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांनी धुडकावून लावत दुधाचा दर 34 वरून पाडून 27 रुपयांपर्यंत खाली आणला आहे. आतापर्यंत दुग्ध विकासमंत्र्यांनी रयत क्रांती संघटना, दूध उत्पादक शेतकरी संघटनांसोबत दूध कंपन्या आणि संघांच्या बैठका घडवून आणल्या. समितीची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. मात्र, शासकीय आदेश दूध कंपन्या आणि संघ जुमानत नसल्याचा निषेध म्हणून आज (ता. २४ नोव्हेंबर) सरकारी आदेशाला ‘रद्दी आदेश’ संबोधत दूध रस्त्यावर ओतत आदेशाची होळी करत आहेत. (Farmers angry with reduction of milk rates.. government protested by pouring milk on streets)

रयत क्रांती संघटनेकडून आज (शुक्रवारी) सकाळी राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथे दूध दरवाढीच्या जीआरची होळी करण्यात आली. सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारने 22 जून 2023 रोजी 34 रुपये प्रतिलिटर भाव देऊ, असे आश्वासन खासगी व सहकारी दूध संघांनी दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

milk producer farmer
Madha Politics : मतासाठी कुणाच्या बंगल्यापुढे झुकणार नाही; निंबाळकरांचा खणखणीत इशारा कोणाला?

सरकारने या दूधदर वाढीच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. नगर जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती असून, जनावरांना चारा नाही, पशुखाद्याचे भाव वाढलेले आहेत. आज दुधाला 25/26 रुपये बाजार मिळत आहे. यामधून दूध उत्पादकांचा खर्चही निघत नाही. म्हणून सरकारच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.

milk producer farmer
Ujani Dam Water Issue : आमदार शिंदे बंधूंच्या बालेकिल्ल्यात पेटला उजनीच्या पाण्याचा प्रश्न

भविष्यात दूध उत्पादकांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेकडून करण्यात आली आहे. रयत क्रांती संघटनेचे राहुरी तालुकाध्यक्ष सतीश पवार, गणेश पवार, सरपंच सुभाष निशाणे, भिकाभाऊ रेवाळे आदींनी दूध रस्त्यावर ओतून देत शासकीय आदेशाची होळी केली.

अकोले तालुक्यातील अंबड इथेही दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दूध संकलन केंद्राबाहेर रस्त्यावर दूध ओतत शासकीय आदेशाची होळी करण्यात आली. किसान सभेचे डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले. राज्यातील 21 जिल्ह्यांत आज आंदोलन सुरू असल्याची माहिती नवले यांनी दिली.

milk producer farmer
Deputy Sarpanch Election : सहकार मंत्र्यांच्या आंबेगावात कमाल; उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे निवडले दोन उपसरपंच!

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीनेही राज्यभर विशेषतः नगर, सोलापूर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे राहुरी तालुकाध्यक्ष सतीश पवार यांनी दिली.

milk producer farmer
Raju Shetti Farmer Protest : शेट्टींनाही 12 हत्तींचे बळ; शाहू महाराजांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेत दिला पाठिंबा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com